.............................. .............................. .............................. ....
इल्मा से इल्म तक
इल्मा से इल्म तक
...
आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या महिला दिन माहिती, का साजरा केला जातो महिला दिनानिमित्त महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्रि्चत करण्यात आला.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात ॠद नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने ॠसार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा ॠजागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने ॠजागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा केला जातो
भारतातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहेत पण त्या स्पर्धा पैकी राष्ट्रीय हित देशासाठी काम करने व समाज हित जोपासने शिक्षणासह महत्त्व देने महत्त्वाचे आहे सर्वच क्षेत्रात महिला रणरागिणी, थोरपुरूष, यांनी कार्य केले व करत आहेत त्या पैकी अशीच काहीशी घटना इल्मा च्या बाबतीत हि घडली जाणून घेवू या इल्मा म्हणते की माझी आई माझी आदर्श होय तीच हिंमत आहे यासाठी जिवन जगत असताना जेव्हा वडीलाचे छत्र लहानपणी हरवले कारण वडील कँन्सरचे पेशंट होते त्यामुळे आजारी चे संकट तर राहणारच पण तेव्हा संकट व सांभाळ जनता वेगवेगळ्या भाषेत उलट सुलट बोलायचे ते हि इल्मा च्या आईने सहन केल तसेच भाऊ याचा हि इल्मा च्या संकटात सिंहाचा वाटा होता भावाने इल्माच्या शिक्षणाच्या बाबतीत तडजोड केली नाही सतत प्रेरणा दिली उदाहरण म्हणजे स्वतःचा कधीच विचार केला नाही सतत इल्मा च्या खर्च कसा भागवायचा या साठी सतत प्रयत्न करत असे तसेच आई ने हि प्रेरणा दिली सतत मुलगी म्हणून कधीच अहवेलना केली नाही क्षणा क्षणाला आई भाऊ याची पावले पाऊल साथ दिली इल्मा ने फार बिकट परिस्थिती वर मात केली देशासाठी सतत इल्माच्या बोलण्यातून दिसते तसेच संविधान यावर विश्वास आहे व त्या साठी त्यांनी पोलीस दलात नौकर स्विकारली
जगात अशी काहीच अवघड नाही फक्त कष्ट ,मेहनत करण्याची गरज आहे आई हि सर्वस्वी आहे हे म्हणनं चुकीचे ठरणार नाही शिक्षण याला महत्त्व देण्याची गरज आहे इल्मा हि
शेतात काम करणारी तरुणी आयपीएस अधिकारी थोडं पण कामाचं 2018 मध्ये इल्मा अफरोजची आयपीएससाठी झाली निवड वडिलांच्या निधनानंतर शेतात काम करुन इल्माने अभ्यासही केलं इल्मा 14 वर्षाची असताना तिच्या वडिलांचं झालं होतं निधन
मुरादाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी या छोट्याशा गावात राहणारी इल्मा अफरोज आज एक आयपीएस अधिकारी झाली आहे. एका सामना शेतकर्याची मुलगी ते आयपीएस अधिकारी हा तिचा प्रवास अतिशय खडतर होता. पण इल्माला तिच्या आई-वडिलांनी पुढे जाण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे इल्मा प्रत्येक अडचणीवर मात कर परिस्थितीशी लढा देत हे निर्भेळ यश मिळवू शकली. तिच्या या यशात तिच्या आईचं मोठं योगदान आहे. कारण आपल्या मुलीला त्यांनी शिकण्यासाठी पूर्ण मुभा दिली होती. इल्मा अफरोज ही जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. इल्मा सांगते की, ’शिकण्यासाठीची लढाऊ वृत्ती मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली. वडील जेव्हा मार्केटमध्ये धान्य विकून यायचे तेव्हा ते सगळ्यात आधी मला पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसे द्यायचे.’ त्यामुळेच इल्माला या गोष्टीचा सर्वाधिक आनंद आहे की, तिचे वडील तिला शिकण्यासाठी नेहमी प्रेरित करायचे. पण वडिलांच्या निधनानंतर इल्माला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक अडचणींवर मात करत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. ’जेव्हा माझे वडील होते तेव्हा ते सर्व शेताची जबाबदारी स्वत: घेत होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर स्वत: शेतात काम केलं आणि अभ्यास देखील.’
इल्माच असंही सांगते की, शिक्षणासाठी अधिक खर्च येऊ नये यासाठी आपलं ग्रॅज्युएशन तिने तत्वज्ञान यातून पूर्ण केलं. तिने दिल्ली विद्यापीठातून तत्वज्ञानात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. यानंतर पुढील अभ्यासासाठी ती थेट ऑक्सफोर्डला गेली. जिथे तिला स्कॉलरशीप देखील मिळाली. इल्माच्या मते, आई आणि भावाने वेळोवेळी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या आईसाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी भारतात परतली. इल्मा
2018 मध्ये आयपीएससाठी इल्माची निवड झाली होती. सध्या ती हैदराबादमध्ये राष्ट्रीय पोलीस अँकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जेव्हा इल्मा आपला अभ्यास करत असायची तेव्हा गावातील अनेक जण तिच्या आईला टोमणे मारायचे. ’मुलीला उगाच डक्यावर चढवून ठेऊ नका.’ असं ते त्यावेळी आईला बोलायचे. पण या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन तिच्या आईने तिला हिंमतने काम करण्याचा कायमच सल्ला दिला. इल्मा शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क, इंडोनेशिया, इंग्लंड यासह अनेक देशांमध्ये जाऊन आळी आहे. पण आपल्या देशात राहण्याचं सुख तिला दुसरीकडे कुठेही मिळालं नाही.
ऑक्सफोर्डमध्ये शिकत असताना तिला स्कॉलरशीप मिळायची. पण स्वत:चा खर्च भागविण्यासाठी ती तिथे पार्ट टाईम जॉब देखील करायची. इल्माच्या मते, खरेपणाच्या जोरावर कोणतंही काम केलं जाऊ शकतं. मग ते भांडी धुण्याचं काम का असे किंवा बाथरुम साफ करण्याचं काम. केल तसेच कधीच छोटे काम म्हणून पाहिलं नाही प्रेरणादायी विचार जागतिक महिला दिन 8 मार्च च्या निमित्ताने

प्रा. नाजेमा अब्बास शेख
लातूर
9423719957
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.