श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे जागतिक महिला दिन संपन्न
------------------------------------------
मुख़्तार मणियार प्रतिनिधि
आज दिनांक 8 मार्च 2021रोजी रामनाथ विद्यालय आलमला येथे जागतिक महिला दिनानिमित्त सौ अर्चना ताई गायकवाड . सभापती पंचायत समिती औसा... यांचा सत्कार रामनाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री कापसे पी एन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, विद्यालयातील सहशिक्षिका सौ सुनंदा निलंगेकर, सौ जय मंगल हिंगणे, सौ दिपश्री उकरडे. यांचा सत्कार सौ अर्चना ताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला... सदर कार्यक्रमात अर्चनाताई गायकवाड व कापसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या... या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त श्री सूर्यवंशी बी. वाय. यांनी सर्वांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री पाटील पी.सी.यांनी केले.. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.