२०० शोभीवंत झाडे लावून व 'वृक्ष कन्या' ही उपाधी देउन महिला दिन साजरा.

 

२०० शोभीवंत झाडे लावून व 'वृक्ष कन्या' ही उपाधी देउन महिला दिन साजरा.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा आगळावेगळा उपक्रम




उत्तुंग  तुझ्या भरारी पुढे   नभ हे शून्य भासावे....
 सामर्थ्य तुझ्या पंखातले अवघ्या विश्वाला समजावे....
आज ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सन्माननीय महिला सदस्यांच्या हस्ते २०० शोभीवंत झाडांचे रोपण करुन, वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनात गत ६४४ दिवस अविरत कार्य करणारया ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ॲड. वैशाली लोंढे-यादव, सौ. वैशाली पाटील,  विमल रेड्डी, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, कल्पना फरकांडे, सीमा धर्माधिकारी, लक्ष्मीताई बटनपुरकर, निकिता कावळे, युगा कनामे, मोहीनी देवनाळे, प्रिया नाईक, कल्पना कुलकर्णी, डॉ. विमल डोळे, सिया लड्डा, सौ. कातपुरे, राजनंदिनी लड्डा, राजलक्ष्मी लड्डा या महिला सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते 'वृक्ष कन्या' ही उपाधी देउन गौरव करण्यात आला.
झाडे लावणे , झाडे जगविणे, झाडांचे संगोपन करणे यामध्ये या महिलांनी अद्वितीय असे कार्य केले आहे.
यावेळी दामीनी पथकातील महिला पोलिस अधिकारी भोले, बिराजदार, साखरे यांचाही वृक्ष देउन सन्मान करण्यात आला.
सोबतच शहर स्वच्छतेकरीता कार्यरत महिला स्वच्छता कर्मचारी यांचा वृक्ष देउन सत्कार करण्यात आला.
लोकनेते विलासराव देशमुख पार्क याठिकाणी झालेल्या वृक्षारोपण व सत्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवा सुनिता कंकणवाडी, लातूर शहरातील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेखा काळे, सुपरिचित कवयत्री शैलेजा कारंडे, ॲड. बायस, मनपा लातूर नगरसेविका स्वाती घोरपडे, मनपा नगरसेविका श्वेता लोंढे, वंडर वर्ड च्या डॉ. सोनम ब्रिजवासी, प्रा. शुभांगी पांचाळ या उपस्थित होते.  
हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, वंडर वर्डचे उमेश ब्रिजवासी, गंगाधर पवार, शिवशंकर सुफलकर, प्रमोद वरपे, महेष गेल्डा, बळीराम दगडे, सिताराम कंजे,  महेश भोकरे,  विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, दयाराम सुडे, खाजाखॉ  पठाण, विकास कातपुरे, मनमोहन डागा यांनी परिश्रम घेतले 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या