सपोनि बाळासाहेब डोंगरे यांच्या तत्परतेमुळे मिळाले जखमी हरिणास जीवदान
औसा प्रतिनिधी : रात्रीच्या गस्तच्या वेळी बोरफळ गावाजवळ एक जखमी हरीण पाहून सपोनि बाळासाहेब डोंगरे यांनी तत्परता दाखवली यामुळे त्या हरिणास जीवदान मिळाले आहे.
औसा पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळासाहेब डोंगरे हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर असताना औसा - तुळजापूर महामार्गावरील बोरफळ गावानजीक एक हरीण जखमी अवस्थेत विव्हळत पडले असल्याचे दिसून आले. हरिणाचे प्राण वाचले पाहिजे यासाठी त्यांनी तात्काळ प्राणीमित्र सचिन क्षीरसागर यांना घटनास्थळी बोलावून घेत आपल्या वाहनातून त्याला औसा येथील रुग्णालयात आणले जखमी हरिणावर डॉ.कुंभारकर यांनी उपचार केले. वेळेत उपचार केल्यामुळे त्या हरिणास जीवदान मिळाले.
पोलीस म्हटले की त्याच्या माणुसकी व तत्परतेबद्दल भुवय्या उंचावल्या जातात परंतु या विभागात यापूर्वीही आणि आजही आपल्या कर्तव्याबरोबर प्राणी मात्रावर दया दाखवणारी बाळासाहेब डोंगरे यांच्यासारखी माणसे आहेत.
रात्रीच्या वेळी तत्परतेने प्राणी मित्रास सोबत घेऊन जखमी हरिणावर उपचार करून त्यास वनविभागाचे कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द केल्यामुळे बाळासाहेब डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.