हरित होळी करीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचा पुढाकार.
होळीच्या निमित्ताने झाडे तोडू नका,
लाकडं जाळू नका.
होळीच्या निमित्ताने झाडे तोडू नका,
लाकडं जाळू नका.
झाडे लावा - झाडे जगवा,
होळी साठी झाडे तोडली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
हा संदेश देणारे पोस्टर्स हातात घेउन ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी हरित होळी साजरी केली.
या निमित्ताने जास्वंद, चाफा, गुलाब अशा रंगबिरेंगी फुलांच्या १०० झाडांचे वाटप करून होळी निमित्ताने तोडल्याजाणारया झाडांची झीज भरून काढण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
होळीच्या निमित्ताने दरवर्षी हजारो झाडे कापली जातात, जाळली जातात. झाडांच्या रक्षणासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी लातूर जिल्हा परिसरात कार्यरत असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी मित्र नगर परिसरात झाडे लावून व मोफत झाडे वाटप करून पर्यावरण रक्षण करणारी होळी साजरी करा हा संदेश दिला.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव, डॉ. जयंत पाटील, गंगाधर पवार, रुषीकेश दरेकर, मनमोहन डागा, प्रमोद निपानीकर, शिवशंकर सुफलकर, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, प्रिया नाईक, मोहीनी देवनाळे, कल्पना फरकांडे, बळीराम दगडे, शुभम आवाड, सुरज पाटील, युगा कनामे, महेश गेलडा, विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, दयाराम सुडे, खाजाखॉ पठान, डी.एम. पाटील, शैलेश सुर्यवंशी, प्रसाद जाधव, सादिक कमलापुरे, राहुल माने, यांनी परिश्रम घेतले..
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.