*लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, 04 घरफोडीच्या /चोरीच्या गुन्ह्याची उकल,चोरीस गेलेला 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत व 03 आरोपींना अटक*
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 05/04 2021 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव , उपविभागीय पोलिस अधिकारी,औसा श्री.राजीव नवले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखा,लातूर चे पोलीस निरीक्षक श्री.गजानंन भातलवंडे यांचे नेतृत्वात उस्मानाबाद ,हिंगोली येथील व सध्या लातूर मध्ये पाल टाकून राहत असलेले आरोपी नामे 1)अमोल उर्फ पप्पू भागवत शिंदे,वय-20 वर्ष,राहणार-धनेगाव तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. 2) अजय उर्फ दुडी सुरकास पवार, वय- 20 वर्ष, राहणार-कोटारोड झोपडपट्टी, ता.वसमत जिल्हा हिंगोली 3) रामाचारी बिस्कीट उर्फ भिम्मान्ना पवार,वय-21, वर्ष राहणार कोटारोड झोपडपट्टी, ता. वसमत जिल्हा हिंगोली यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी अडीच ते तीन महिन्यापूर्वी याकतपूर रोड,औसा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरी केली असून त्यानंतर काही दिवसांनीच लातूर येथील रिंग रोड वरील एका पेट्रोल पंपाजवळ झोपलेल्या इसमाच्या खिशातून मोबाईल व पैसे चोरले आहेत. तसेच भादा पोलीस ठाणे हद्दीतील उजनी येथून पण एक मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे. तसेच आठ ते दहा दिवसांपूर्वी परत औसा येथे दोन घराचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरली असल्याचेही सांगितले होते
सदर आरोपी कडून पोलीस ठाणे औसा येथे गुरंन 32/2021 व 77/2021 कलम 457,380 भादवी, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुरंन. 56/2021 कलम 379 भादवी, व पोलीस ठाणे भादा येथे गुरंन 28/2021 कलम 379 भादवी प्रमाणे एकूण 04 गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल 25 ग्रॅम सोन्याचे दागिने ,दोन मोबाईल फोन व अकराशे रुपये नगदी असा एकूण एक लाख 48 हजार 600 रुपये चा मुद्देमाल नमूद अटक आरोपींता कडून हस्तगत केला असून अधिक तपास सुरु आहे.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गेली दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्याचे पथके परिश्रम घेत होते.
या कामगिरी मध्ये पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा श्री.राजीव नवले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार श्री.अंगद कोतवाड, श्री.रामहरी भोसले, श्री.युसुफ शेख, श्री.राम गवारे, श्री.राजेंद्र टेकाळे, श्री.हारून लोहार , श्री.राजू मस्के, श्री.प्रकाश भोसले , श्री.नितिन कटारे ,चालक श्री.नागनाथ जांभळे यांनी यांचा सहभाग होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.