रेमडिसीवर ची लूट थांबवा जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख
जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्याकडे केली तक्रार
औसा प्रतिनिधी औसा
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात रेमडीसीवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करून गोरगरीब सामान्य जनतेची लूट केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा औशाचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी जिल्हाधिकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांची भेट घेऊन थेट तक्रार केली आहे .या इंजेक्शनची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी अफसर शेख यांनी केली. लातूर जिल्ह्यात मार्च पासून पुन्हा कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .जिल्ह्यात सर्वत्र रुग्णालये भरली आहेत .वाढत्या रुग्णसख्येंमुळे रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवीर या प इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ज्यांचा वशिला आह,त्यांनाच हे इंजेक्शन तात्काळ उपलब्ध होत आहे. कोरोना व न्यूमोनियाच्या रुग्णांना इंजेक्शन आवश्यक असून इतर जिल्ह्यात हे इंजेक्शनची टंचाई कशी काय होते, नाही जिल्हयाला योग्य कोटा उपलब्ध होत नाही का?असा सवाल डॉ. अफसर शेख यांनी निवेदनात केला आहे .यावेळी राष्ट्रवादीचे युवक चे औसा तालुकाध्यक्ष अड शीवाजी सावंत उपस्थित होते.
चौकट
डॉ अफसर शेख यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अमीत विलासराव देशमुख व आरोग्य राज्यमंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. लातूर जिल्ह्यात रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असून जिल्ह्याला योग्य साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मंत्रीमहोदयांनी तात्काळ याबाबत कारवाईची ग्वाही दिल्याचे डॉ अफसर शेख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.