रेमडिसीवर ची लूट थांबवा जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख यांची जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार

 रेमडिसीवर ची लूट थांबवा जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख यांची जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार



औसा मुख्तार मणियार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात रेमडीसीवर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करून गोरगरीब सामान्य जनतेची लूट केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा औशाचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी जिल्हाधिकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी यांची भेट घेऊन थेट तक्रार केली आहे .या इंजेक्शनची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी शेख यांनी केली. लातूर जिल्ह्यात मार्च पासून पुन्हा कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .जिल्ह्यात सर्वत्र रुग्णालये भरली आहेत .वाढत्या रुग्णसख्येंमुळे रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवर या प इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ज्यांचा वशिला आह,त्यांनाच हे इंजेक्शन तात्काळ उपलब्ध होत आहे. कोरोना व न्यूमोनियाच्या  रुग्णांना इंजेक्शन आवश्यक असून इतर जिल्ह्यात हे इंजेक्शनची टंचाई कशी काय होते,जिल्हयाला योग्य कोटा उपलब्ध होत नाही का?असा सवाल डॉ.शेख यांनी निवेदनात केला आहे ‌.यावेळी रायुकॉंचे औसा तालुकाध्यक्ष शीवाजी सावंत उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या