येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जून मध्ये,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

 

येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा

आता जून मध्ये,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती





 

लातूर प्रतिनिधी : १५ एप्रिल :

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मामुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीवैद्यकीय शिक्षण मंत्री नाअमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

    या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

   या परीक्षा पुढे ढकलणे बाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातआरोग्य मंत्री राजेश टोपेआणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहेअशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या