महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशन च्या वतीने बँक खाजगीकरण विरोधी अभियान 20 एप्रिल 2021 पासून सुरू होणार



महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशन च्या वतीने बँक खाजगीकरण विरोधी अभियान 20 एप्रिल 2021 पासून सुरू होणार



File photo 


महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशनच्या वतीने दिनांक 20 एप्रिल 2021 संघटनेच्या 75 व्या वर्धापनदिनी बँक खाजगीकरण विरोधी अभियानाची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे विविध बँकेतील पाच हजारवर शाखेतून काम करणारे तीस हजारावर सभासद, २५ लाख लोकांमधून खाजगीकरण विरोधी अभियानाला त्यांचा पाठिंबा मिळवतील. माननीय प्रधानमंत्री तसेच लोकसभेचे सभापती यांना संघटनेच्यावतीने सादर करण्यात येणाऱ्या याचिकेवर त्यांच्या सह्या घेतील.
 बँकाचे खासगीकरण करण्यात आले तर सामान्य माणसांनी कष्टातून जमा केलेली बचत असुरक्षित बनेल, खेडे विभागातून बँकिंग काढता पाय घेईल,  सामान्य माणसाला शेतीला कर्ज देताना बँक आपला हात आखडता घेतील ही संघटनेची भूमिका सामान्य जनतेला समजावून सांगून बँक कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बँक खासगीकरण विरोधी अभियानात सामान्य जनतेला सहभागी करून घेतील.
एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात 20 एप्रिल 2021 रोजी सुरू करण्यात येत आहे.  या प्रश्नावर जनतेत मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी संघटनेतर्फे पोस्टर्स, पत्रके प्रसिद्ध करण्यात येत आहेत, कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आलेले निर्बंध लक्षात घेता समाज माध्यमाद्वारे अनेक दृक-श्राव्य फितीचा वापर करत संघटनेचे कार्यकर्ते जनतेशी संवाद साधतील आणि खाजगीकरण विरोधी अभियान जनसंवाद हे यशस्वी करतील.
संघटनेचे कार्यकर्ते या मोहिमेचा एक भाग म्हणून सरपंच ते लोकसभा, राज्यसभा खासदार सर्व स्तरातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना भेटतील आणि त्यांचा बँक खासगीकरण अभियानाला पाठिंबा मिळवतील कारण संघटनेच्या मते बँक खाजगीकरण सामान्य जनतेच्या हिताचे नाही
नंदकुमार चव्हाण        
 देवीदास तुळजापूरकर
        अध्यक्ष                                                                                                        जनरल सेक्रेटरी

--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या