खानापूर शिवारात ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान
(औसा प्रतिनिधी )
तालुक्यातील खानापूर शिवारातील शेतकऱ्याचा ४ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे .याबाबतची माहिती अशी की ,मंगेश प्रदीप अंबुरे व प्रमोद राम कृष्ण अंबुरेे यांच्या खानापूर येथील सर्वे नंबर 46 मधील शेतात उसाचे पीक जोमात आले होते. शनिवार दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 च्या सुमारास शेतकऱ्याच्या ऊसाला शॉर्टसर्किटने अचानक आग लागून या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला असून या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोना विषाणूंचे संकट ,अडचणीत आलेला शेतीव्यवसाय आणि नैसर्गिक संकटामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे कंबरडे मोडले आहे .या घटनेची माहिती मिळताच तलाठी बी.आर. माने यांनी घटनास्थळी जाऊन जळालेल्या उसाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालय औसा येथे दिला आहे. सर्वे नंबर 46 मधील एक हेक्टर 81 आर जमिनीतील चार एकर ऊस जळाल्याने मंगेश प्रदीप अंबुरे व प्रमोद रामकृष्ण अंबुरे या शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. थोड्याच दिवसात साखर कारखान्यामार्फत उसाची तोड होणार होती, परंतु शनिवारी शॉर्टसर्किटमुळे उभा ऊस जळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे .मंगेश आंबुरे व प्रदीप प्रमोद अंबुरे यांनी सुधारित जातीच्या उसाची लागवड करून उसाचे पीक चांगले आणले होते परंतु अचानक कष्टाने पिकवलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.