युवकाकडुन निजाम कालीन कब्रस्तानची स्वच्छता
नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व नगरसेवक गोपाळ धानुरे याचे आभार
औसा प्रतिनिधि
औसा येथे भादा रोडवर निजाम कालीन कब्रस्तान आहे पण अस्वच्छतेमुळे अनेक वर्षापासून येथे झाडेझुडपे व घाण असल्यामुळे मागील सात वर्षा पासुन दफन विधी करण्यात आली नाही कितीही श्रीमंत गरीब ,लहान मोठा असो सर्वाचे शेवटचे घर हे कब्रस्तान असते पैसा दौलत कमवितो पण शेवटी रिकाम्या हातानेच त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. प्रत्येकाचे शेवटचे व कायमचे घर हे स्मशानभूमी कबस्थान आहे पण याकडे कधीही जिवंतपणी कुणी लक्ष देत नाही यासाठी ही बाब लक्षात येताच औसा येथील काही युवकांनी इम्रान बागवान व समीर शेख यांच्या लक्षात आली या दोघांनी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व भाजप चे स्थानिक नगरसेवक गोपाळ धानुरे यांना निदर्शनात आणून दिले आणि नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व गोपाळ धानुरे यांनी आम्हाला सहकार्य केले. नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी साफसफाई करण्यासाठी जीसीपी दिली व नगरसेवक गोपाळ धनुरे यांनी आम्ही सभागृहात मुद्दा मांडु मीटिंग घेऊन नगरपालिकेतर्फे बजेट देऊन कंपाउंड वॉल करून देऊ असे आश्वासन दिले . तसेच औसा शहरातील इम्रान बागवान व समीर शेख यांनी आपल्या काही मित्राला घेऊन या कब्रस्तान ची स्वच्छता चालू केली तसेच आठ दिवसात सपूर्ण कब्रस्तान ची स्वच्छता केली. आज संपूर्ण साफ सफाई झाली आहे आम्ही आता नगराध्यक्ष व नगरसेवक ची भेट घेऊन यासाठी कंपाऊंड वाॅल शक्य तो लवकर व्हावे यासाठी मागणी करणार आहोत. या साफसफाई साठी आमचे मित्र तोफीक बागवान ,मजीद शेख, राशिद शेख,युसुफ शेख, अजीम शेख, शफीक शेख, शेख साजिद यांनी हातभार लावले या युवकाने केलेल्या कार्याबद्दल शहरात त्याचे कौतुक केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.