जबाबदार नागरीकांनो कोरोना लसीकरण करून घेवून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या लढाईत आपण आपली जबाबदारी पार पाडा
लातूर ः सध्या कोरोनाने फार वाईट परिस्थिती निर्माण केली आहे. आज सर्वांनाच कोरोना या जागतीक महामारीने ग्रासले असून सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जेष्ठांना कोणी नौकरीवर ठेवून घेत नाही. जर नौकरी असेल तर त्यांना काढून टाकण्यात येते. तरूणांना नौकर्या नाहीत कर्ते पुरूषच बेकार होत असल्याने आजची परिस्थिती अतीगंभीर बनली आहे. देशावर गेल्यावर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट असून गेल्या चार महिन्यापासून हे संकट थोड्याप्रमाणात निवळले असे वाटत होते परंतू ते न निवळता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढलेले पहायला मिळत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक प्रभावी दिसत आहे. या काळात अनेक रूग्णांना प्राण गमवावे लागले आहे. हॉस्पिटलमध्ये रूग्णांना बेड मिळत नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. लोकांचे हालचे बेहाल होतांनाचे चित्र पहायला मिळते आहे. हे सर्व चित्र दिसत असतांना बाजारात गर्दी कांही केल्या कमी होत नसल्याचे पाहून व रूग्णांच्या संख्येत रोजच्या रोज वाढ होत असल्याने व यातून रूग्णांचे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारला नाईलाजास्तव लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. तरी जबाबदार नागरीक हे आपली जबाबदारी ओळखून या लॉकडाऊन काळात बाहेर न फिरता घरातच राहून आपण ही कोरोनाविरूध्दची लढाई लढायची आहे. या लढाईला आपण सर्वांनी एकत्रीतरित्या लढायचे आहे. पण नागरीक आज लॉकडाऊनमध्येही आपल्या जबाबदारीचे भान विसरून चालले आहेत. ते बिनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसतात.
पण कांही बेजबाबदार नागरीकांना पोलीसांनी हटकले तर मी बँकेत चाललोय, मी हॉस्पिटलला चाललोय, मी शेतीच्या कामाला चाललोय, मी माझ्या कामावर चाललोय अशी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. ही जर कारणे जबाबदार नागरीकांची खरोखरच असतील तर त्याला प्रशासन नक्कीच सहाय्य करत आहे परंतू कांही बेजबाबदार नागरीक विनाकारण अशाच प्रकारची कारणे दाखवून रस्त्याने बिनधास्त फिरतांना दिसत आहेत. अशांना पोलीसांनी चोप दिला किंवा रट्टे दिले तर कुठे काय बिघडले याने तर उलट या कोरोना लढाईला बळ मिळणार असून बेजबाबदार नागरीकांवर पोलीसांचा वचक बसणार आहे. आपणही एक जबाबदार नागरीक बनून या कोरोनाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी प्रथमतः आपण जर जेष्ठ असाल तर आपण लसीकरण करून घ्यावे. व आपल्या घरातील सर्व जेष्ठांचे लसीकरण करून घ्यावे. जर आपण तरूण असाल तर आपण आपली जबाबदारी ओळखून घरातील जेष्ठांना लसीकरण करून घेण्यासाठी भाग पाडावे व येणार्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी ही लसच आपणासाठी महत्वपूर्ण ठरणार असून आपण सर्व जेष्ठांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केले आहे.
आज आपल्या देशात जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आशासेवीका, महानगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र काम करतांना पहावयास मिळत आहेत. हेही लोक शेवटी माणसेच आहेत. त्यांनाही आता कुठेतरी रेस्टची गरज आहे परंतू ते आपल्या सर्वांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या कोरोनाच्या लढाईत हेच देवरूपी भुमिका बजावत आहेत. तरी आपण सर्वांनी यांचेही आभार मानने गरजेचे आहे. व त्यांनाही कुठेतरी वाटायला हवे की जबाबदार नागरीक हे आपली जबाबदारी ओळखून या कोरोनाच्या लढाईत आपल्यासोबत लढा देत आहेत. हे आपले कर्तव्य असून ते आपण चांगल्या प्रकार पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हीच सध्याची गरज आहे.
तसेच कोरोना लसीविषयी जनसामान्यात असलेली भीती काढण्यासाठी जबाबदार नागरीकांनी प्रथमतः लसीकरण करून घ्यावे व लसीकरण करून घेतल्यानंतर आपल्या आसपासच्या मित्र परिवारांना लसीबद्दलची माहिती व त्यांच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावेत हे एक सामाजिक कार्य असून एक जबाबदार नागरीक जेंव्हा जागरूक होतो तेंव्हा क्र्रांती घडते म्हणजेच कोरोना लढाईत आपण सर्वजण एकत्र होतो. कोरोनाला थोपविण्यासाठी एकता ही महत्वाची आहे कारण की हा संसर्गजन्य रोग असल्याने तो एकमेकांपासून पसरतो आहे. त्यामुळे कसलीही भिती न बाळगता कोरोना लस ही अत्यंत चांगली असून याचे कांहीही साईड इफेक्ट दिसत नाहीत. उगाच मनात संभ्रम बाळगुन तुम्ही लसीकरणाचा लाभ न घेता राहू नका. कारण आम्ही स्वतः हि लस आमच्या सर्व जेष्ठांना दिली आहे. त्यांच्यामध्ये कांहीही फरक जाणवला नाही. उलट ते ठणठणीत आज आमच्यासोबत आहेत. यासाठी लसीकरण म्हणजे कोरोना काळातील ढाल असून यदाकदाचित आपणास कोरोना झाला तर ही लसच तुम्हाला तुमच्यातील ह्युमिनीटी पॉवर वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असून जागरूक व जबाबदार नागरीकांनी कोरोनाची लस टोचून घेवून आपणही कोरोनाच्या लढाईतील जबाबदारी पार पाडून एक जबाबदार नागरीक बनावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.