गाव तलावात करंट लागून म्हैस दगावली

 गाव तलावात करंट लागून म्हैस दगावली




 औसा  प्रतिनिधी औसा शहरातील  तहसील कार्यालयाच्या पाठीमागील  गाव तलावाच्या बाजूस महावितरणच्या विद्युत पोल मध्ये करंट उतरल्याने पशुपालकांची म्हैस  दगावल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की शौकत शेख रां बिलाल नगर औसा या पशुपालकांची मेहश रविवार दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी तलावात पाणी पिण्यासाठी गेली  असता पाणी पिऊन येताना विद्युत पोलला घासल्याने पोल मध्ये करंट उतरून म्हैस दगावली आहे. महावितरणचा गलथान कारभार कारभारामुळे म्हैस मरण पावली आहे. याच ठिकाणी सुदैवाने  दुसरे कुणी गेले नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दररोज आठ लिटर प्रमाणे दोन वेळेस 15 ते 16 लिटर दूध देणारी म्हशीची किंमत लाखाच्या जवळपास असल्याने महावितरणने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शौकत शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना  केली आहे .आपण महावितरणच्या विरोधात तक्रार दिली असल्याचेही शौकत शेख यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या