गर्दी टाळण्यासाठी औसा भाजी मार्केटचे स्थलांतर
औसा प्रतिनिधी कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने औसा शहरातील लातूर वेस हनुमान मंदिर परिसरातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी औसा भाजीमार्केट मुक्तेश्वर रोड लगतच्या अन्नपूर्णा नगर येथील खुल्या मैदानात स्थलांतरित करण्यात आले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हनुमान मंदिर परिसरातून भाजी मार्केटचे मुक्तेश्वर रोड कडे स्थलांतर केले आहे. भाजी विक्रेत्यांना नगर परिषदे मार्फत सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करण्यासाठी मार्किंग व मंडप उभारून व्यवस्था करून ठेवण्यात आले आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी आणि कोरोना संकट काळाचा सर्वांनी मिळून सामना करण्यासाठी नगरपरिषदेने भाजी मार्केटचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्तेश्वर रोड लगतच्या अन्नपूर्णा नगर येथील खुल्या मैदानात प्रशस्त जागा व दुचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा असल्याने या जागेत गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भाजी विक्रीचा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने भाजी विक्रे त्यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशान्वये सकाळी 7 ते 11 या वेळेत घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत व्यवसाय करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.