ककय्या सामाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 

ककय्या सामाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी







 लातूर :  विरशैव ककय्या समाज प्रतिष्ठान लातूर च्या वतीने भारतरत्न ,महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130  वी जयंती साजरी करण्यात आली . 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिन दलित ' महिला कष्ट करी यांच्या साठी कार्य केले भारतीय संविधान निर्माण करून आपला भारत देश आखंड  ठेवला असे प्रतिपादन ककय्या समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अँड. जांबुवंतराव सोनकवडे यांनी केले . या कार्यक्रमात Ph.D.मिळाल्या बदल प्रा. डॉ. महावीर महादेवराव कटके यांचा सत्कार  करण्यात आला या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे ,प्रभाकर कोकणे. अप्पाराव कावळे , गणेश सावळकर ,दिगंबर खरटमोल ,शंकरराव इंगळे ,विजयकुमार  महावरकर ,अँड. महेश कोकणे, विवेकानंद सोनकवडे . विजयकुमार रसाळ , व ककय्या समाज बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार प्रतिष्ठानचे  सचिव, गणेश सावळकर यांनी मानले . कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या