जिल्हयातील सर्व आस्थापना कार्यालयात* *महिला तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक

 *जिल्हयातील सर्व आस्थापना कार्यालयात*

*महिला तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक*



        लातूर- कामाच्या ठिकाणी  महिलांचे लैगिंक छळापासून महिलांचे संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम अधिनियमातील कलम 4 (1) अन्वये ज्या कार्यालयात 10 किंवा 10 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी असतील अशी कार्यालये, अस्थापना, संस्था, महामंडळे, खाजगी कार्यालये, महाविद्यालये, शाळा, कंपन्या, उद्योग, ट्रस्ट, रुग्णालये, दुकाने, बँका, सहकारी संस्था, सोसायटी, प्रेक्षागृहे, खाजगी कोचिंग क्लासेस,व्यावसाय, विक्री व वितरण व्यवस्था, मॉल, सेवापुरवठादार, इ. ठिकाणी नियोक्त्याने / कार्यालय प्रमुखाने अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक आहे.

नियोक्त्याने /  कार्यालय  प्रमुखाने जर अंतर्गत तक्रार समिती गठीत केली नसल्यास अधिनियमाच्या कलम 26 नुसार त्यांना 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. लातूर जिल्हयातील वरील प्रमाणे सर्व अस्थापना व कार्यालयात तात्काळ 04 दिवसाच्या आत अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्यात यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांनी केले आहे.

तसेच कार्यालया अंतर्गत तक्रार समिती गठीत करुन त्याबाबतचा बोर्ड कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून त्याबाबतचा फोटो तसेच समिती अध्यक्ष व सदस्यांचे नांव भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी बाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत, पहीला मजला लातूर यांचेकडे dwcdolatur@gmail.com  इमेलवर सादर करावा असेही श्रीमती वर्षा पवार यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या