रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक दोन रेमडीसीवीर जप्त, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी.ची कारवाई*

            

*रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक दोन रेमडीसीवीर जप्त, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी.ची कारवाई*

लातूर प्रतिनिधी



              सध्याचे कोविड 19 परिस्थितीमध्ये काही लोक लातूर शहरात रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळाबाजार करून जास्त किमतीमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन्स विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अशा काळाबाजार करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.


              या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ,शहर श्री.जितेंद्र जगदाळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक श्री संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेडीमसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर पोलीस होते.


              पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम व त्यांची टीम पोलीस अमलदार बेल्लाळे ,अर्जुन राजपूत, गिरी, मदने चालक शिंगडे तसेच अन्न व औषधी विभाग चे औषध निरीक्षक श्री सचिन बुगड यांच्या पथकाने एका मंगल कार्यालयाच्या जवळून

1)ऋषिकेश माधव कसपटे रा. वाल्मिकी नगर, लातूर यास इंजेक्शन सह  ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता नमूद गुन्ह्यातील  इतर इसम नामे

1) शरद नागनाथ डोंबे रा.विकास नगर, लातूर

2)ओम सुदर्शन पुरी रा.एकूरगा 

3)ओमप्रसाद हणमंत जाधव  रा.हिप्पळगाव 

4)सिद्धेश्वर राजेंद्र सुरवसे राजेंद्र.नंदी स्टॉप ,लातूर

5)किरण भरत मुदाळे रा. नंदी स्टॉप, लातूर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पण एक असेल एकूण 2 रेमडीसीवीर इंजेक्शन्स आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा एकूण 1,18,000/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ,

वरील आरोपी हे सदरचे रेमडीसिविर इंजेक्शन्स प्रत्येकी 25 हजार रुपये दराने  गरजू व्यक्तींना विक्री करणार होते. नमूद व्यक्ती वर पोलीस ठाणे पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम  420,188,34 भारतीय दंड संहिता कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदा ,, कलम 3 साथरोग नियंत्रण कायदा ,, कलम 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 कलम 18 सी 27 औषधी  आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कराड ,पोलीस अमलदार वायगावकर हे करत आहेत


           अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही औषधांची काळाबाजारी किंवा चढ्या दराने विक्री करू नये असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने करण्यात करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या