*चाकुर नगरपंचायतच्या मटन दारू पार्टी प्रकरणाची चौकशी मुख्याधिकारी यांच्याकडून काढून तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी.*
-- *लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांची मागणी.*
लातुर : दि. ३० - जिल्हाधिकारी यांच्या कोरोना प्रतिबंधाच्या आदेशाची पायमल्ली करून चाकूर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता, स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता विभागाचे लिपिक, स्वच्छताचे शहरप्रमुख चार अधिकाऱ्यांनी चाकूर शहराजवळील एका हॉटेलात मटन दारू पार्टी करून एक प्रकारे प्रशासनाच्याच तोंडाला काळे फासले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची नाचक्की झाली आहे. दुकाने बंद ठेवा, हॉटेल बंद ठेवा असे सांगत फिरणारे आणि लोकांकडून पैसे गोळा करणारे चाकुर नगरपंचायतीचे प्रमोद काष्टेवाड, मुकुंद मस्के, व्यंकट सूर्यवंशी आणि सचिन होळंबे या चार कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रतापाची चौकशी करण्याकामी चाकुरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांची केलेली नेमणूक म्हणजे चोरांच्या हातात चाव्या दिल्यासारखे आहे. असे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
चाकूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडून या प्रकरणी संबंधित चौघांवर कार्यवाही होईल की नाही ही दाट शंका आहे. असेही पनाळे यांनी म्हटले आहे.
तेव्हा लातूरचे जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बी. पी. यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत तहसिलदार अथवा उपजिल्हाधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांची चौकशी कामी नेमणूक करावी. अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.