*पहिलं सर्व सामान्यांच्या* *पोटापाण्याचा प्रश्न सोडवा मग * *खुशाल लॉक डाऊन करा* *
नाहीतर कष्टकरी कामगारांच्या बँक खात्यावर दर महिन्याला प्रत्येकी दहा हजार जमा करा.
*भिम आर्मी जिल्हा महासचिव* *लक्ष्मण कांबळे*
लातुर प्रतिनिधी :-
गेल्या वर्ष भरा पासून देशात कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूंमुळे जन सामन्याचे जीवन विस्कळीत होऊन , जनतेचे बेहाल झाले होते,
अशातच २०२१ साला मध्ये कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ,याला आवर घालण्यासाठी शासनाने दुसऱ्यांदा लॉक डाऊन ची घोषणा करत असल्याने सर्व सामान्य जनतेत चेहऱ्यावर असंतोषाचे वातावरण दिसत आहे, गेल्या वर्षी लॉक डाऊन केले गेल्यामुळे रोजनदारीवर , शेत मजुरांवर कष्टकरी कामगारांवर बांधकाम मजुरावर तसेच व्यापारी यांचेवर उपासमारीची वेळ आली होती, ती आज ही कायम आहे, जर लॉक डाऊन करायचाच असेल तर सर्वांना करा , गोरगरीब जनतेला या लॉक डाऊन चा फटका सोसावा लागत आहे , दरम्यानच्या काळात हाताला काम मिळत नसल्यामुळे , लेकरा बाळांना काय खाऊ घालायचे हा कष्टकरी जनतेच्या समोर मोठा प्रश्न भेडसावत असल्याने , शासनाने कष्टकरी व हातावर पोट असणाऱ्या जनतेची पहिलं पोटापाण्याची सोय करावी ,मगच लॉक डाऊनचा विचार करावा, कारण
आमदार खासदार याना वेतन चालू आहे शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी यांचा पण पगार चालू आहे याना कितीही दिवस लॉक डाऊन असेल तर याना आर्थिक अडचण भासत नाही , त्यामुळे शेतकरी कष्टकरी , बांधकाम मजूर , शेतमजूर व व्यापारी तसेच शेहरातील व ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या हातावर पोट असणाऱ्या जनतेची फार दयनीय अवस्था निर्माण झाली ,आहे त्यामुळे शासनाने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे व काळाची गरज आहे,
सरकार माय बाप हो तुमी घालून दिलेल्या नियमांचे आज पर्यंत आम्ही पालन करत आलो आहेत , आता जे नियम घालचाल ते आम्ही पाळू पण काम बंद करू नका . कारण लॉक डाऊन करून काम बंद कराल तर आम्ही हातावर पोट असणाऱ्यांनी खायचे तरी काय ? ते तुमीच सांगा नाही तर आम्हाला लॉक डाऊन केले मुळे हाताला काम मिळत नसल्याने उपाशीपोटी मरावे लागेल, की काय याची भीती भेडसावत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.