उन्हाळी मकावर करपा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव..

 उन्हाळी मकावर  करपा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव.. 





औसा /-प्रतिनिधी : आपले पशुधन जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी मका आणि हिरव्या चाऱ्यासाठी गवताची लागवड केली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व करडई चे पीक मोठ्या प्रमाणात पेरले होते. रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कडब्याला पर्याय म्हणून उन्हाळी मका व सुधारित पद्धतीच्या गवताची लागवड केली होती. परंतु उन्हाळी मका आणि चाऱ्याच्या गवतावर करपा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने दुभत्या गाई, म्हशी व बैलासाठी हिरव्या चाऱ्याची शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. मागील वर्षी परतीचा मान्सून मध्ये समाधानकारक पाऊस पडत शेतकऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी मका, गजराज गवत, मेथी गवत व अन्य प्रकारच्या हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करून आपल्या पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याचे स्वप्न पाहिले होते. विहिरी, तलाव बोरवेल मध्ये पाणीसठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात मका आणि चाऱ्याचे गवत लावले. परंतु नैसर्गिक संकटामुळे हिरव्या चाऱ्यावरही करपा आणि लष्करी आळी पडल्यामुळे मका आणि गवताचे पाने आळ्यानी कुरतडतल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आपल्या पशुधनाची जोपासना करण्यास करायची कशी ?  ही समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. 15 ते 20 रुपयात कडब्याची पेंडी विकली जात आहे. त्यातच बैल, वासरे आणि दुभत्या त गाई, म्हशी साठी लागवड केलेल्या हिरव्या चाऱ्यावर निसर्गाचा कोप झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. वाढती महागाई आणि नैसर्गिक संकटाचा कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने दयनीय अवस्था झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या