महाराष्ट्रातील घटना देशातील नितीमुल्ये उद्ध्वस्त करणारी
भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका प्रमुख मंत्र्याच्या विभागातील वरीष्ठ अधिकार्यांने आपल्याच मंत्र्यावर खंडणी वसूल करून 100 कोटी द्यावे, अशी मागणी केल्याचे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व सध्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबिरसिंह यांनी त्यांच्याच खात्याचे मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना सविस्तर लेखी पत्र लिहून कळविले होते. याच पत्रामध्ये त्यांनी ना.अनिल देशमुख यांनी सबइन्सपेक्टर सचिन वाझे यांना मुंबई शहरातील 1750 बार हॉटेल्स, रेस्टॉरंटकडून 50 कोटी व इतर मार्गाने 50 कोटी असे 100 कोटी दरमहा द्यावे, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर संजय पाटील सहायक आयुक्त समाजसेवा विभाग व भुजबळ पोलिस उपायुक्त मुंबई यांना ना.अनिल देशमुख यांनी गृहमंत्र्याच्या कार्यालयात बोलावले त्यांच्या समक्ष त्यांचे पी.एस.(खाजगी सचिव) श्री.पालांडे यांनी दरमहा विविध मार्गाने 100 कोटी द्यावे, अशी मागणी केल्याचे आपणांस संजय पाटील यांनी सांगितले. हे परमवीरसिंह यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे. व या आरोपाचे मा.हायकोर्टात आपल्या नावाने रीट अर्ज दाखल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी देशाच्या व राज्याच्या राजकारणात स्वार्थासाठी कधीही एवढ्या लुटारू पध्दतीने कुठल्या मंत्र्यांनी कृती केल्याचे आरोप अद्यापपर्यंत कोणावरही झाले नाहीत. पुरोगामी अध्यात्मवादी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटणा राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षेनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत मुत्सदेगिरीने अभ्यासपूर्ण व आक्रमक मांडणी करून संपूर्ण जागाच्या समोर उघडकीस आणली आहे. महाभारतामध्ये कौरवाचे अनेक षडयंत्र उघडे पाडून त्यांना नेस्तनाबूत करण्याचे कार्य महाप्रतापी अर्जुनाने व पांडवाने करून दाखवले तसेच राज्यामध्ये देेवेंद्र फडणवीस वाईट प्रवृत्ती विरूध्द महारथी अर्जुनासारखे लढत आहेत.
परमवीरसिंहने मुंबई उच्च न्यायालयात जे रीट दाखल केले त्यावरती मा.न्यायालयाने अनिल देशमुख प्रकरण गंभीर असून याची चौकशी एन.आय.ए. कडे द्यावी, असा आदेश दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. खरे तर महाराष्ट्राच्या परंपरेनुसार त्यांनी आपल्याच खात्यातील अति वरीष्ठ अधिकार्यांनी सर्वोच्च न्यायालयात व जाहीररित्या लेखी आरोप केल्यास त्या क्षणाला राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे होते, ते झाले नाही.
उद्योगपती श्री.मुकेश अंबाणी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली गाडी सचिन वझे यांचे मित्र मनसुख यांची होती. त्या मनसुखचा मृत्यु झाला. त्याचा तपास कोर्ट आदेशाप्रमाणे एनआयए कडे देण्यात आला. त्यांनी वझे यांच्याविरूध खुनाचा गुन्हा नोंद केला. व वझेंना अटक केली आहे. वझे यांनी जेलमधून एक विस्तृत पत्र लिहून त्यात विविध राजकीय नेत्यांच्या कुकृतीची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सचिन वझेंना परत पोलिस विभागात फेरनियुक्ती देवू नये, असे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सांगणे आहे.
त्यामुळे कामावर घेण्यासाठी 2 कोटी द्यावे लागतील, असे अनिल देशमुख यांनी मागितल्याचेही त्यांनी लिहिले. याबरोबरच वझे यांनी ना.अनिल परब, शिव सेना मंत्री यांनी मुंबईत दरमहा 50 कोटी कॉन्ट्रॅक्टरकडून व विविध मार्गाने जमा करून द्यावे, अशी मागणी केल्याचे लिहीले आहे. श्री.परमबीरसिंह व वझे यांच्या पत्राची चौकशी एन.आय.ए. व सी.आय.डी. च्या केंद्रशासीत अधिकार्यामार्फत होत आहे. यातून नक्कीच आणखीन काही कुकर्म बाहेर येतील या प्रकरणाची चौकशी आता सी.बी.आय.करीत आहे. सी.बी.आय.ने अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे व पी.ए. कुंदन शिंदे, यांची चौकशी करून परमबीरसिंहचा जवाब घेतला आहे. सचिन वाझे यांच्या घरातून व वझेची जवळची महिला हिच्या घरातून महत्त्वाची डायरी मिळवली आहे. त्यामध्ये पैसे कोठून आले कोणाला दिले याची माहिती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन कोण मिळतील काय असेल हे येत्या काही दिवसात जगासमोर येणार, अशाच पध्दतीने दुसरी काळीमा फासणारी घटना ना.देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणली. बीडमधून पुण्याला आलेली पुजा चव्हाण हिने आत्महत्या केली. त्या घटनेची सर्व जाबाबदारी ना.संजय राठोड यांची आहे. म्हणून त्यांनी राजीणामा द्यावा. अशी मागणी त्यांनी केली. त्यातच संजय राठोड यांना राजीणामा द्यावा लागला. त्या प्रकरणाचा तपास चालु आहे. अशाच पध्दतीने रेणू शर्मा या महिलेने मला चित्रपटसृष्टीमध्ये काम देण्याच्या अमिषाने जाळ्यात अडकावले. व माझा लैगिक छळ केला. त्यातून मला मुलगी झाल्याचेही तिच्या बहिणीने लेखी अर्ज देवून तक्रार केल्याची घटणा सर्व देशात प्रसिध्द झाली होती. पंरतु त्या प्रकरणाला वेगळ्या पध्दतीने बगल देण्याचे काम सत्ताधार्यांनी केल्याचे सर्वांनी पाहिले. एका बाजुला सत्तेचा दुरूपयोग करून आर्थिक, शारिरीक गुन्हेगारी करणारे शासनातील पदाधिकारी व दुसरीकडे याच देशात तत्वासाठी, विचारासाठी आपल्या पदाचा त्याग करून संपूर्ण देशात आदर्श निर्माण करणारे नेते आहेत. ज्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या क्रांतीसाठी संपूर्ण राज्यकारभाराला 33 टक्के आरक्षणासाठी हिंदू कोड बील तयार केले ते मंजूर होत नाही असे दिसले. तेंव्हा त्यांनी केंद्रिय मंत्रीमंडळाच्या नेहरू सरकारमध्ये राजीनामा दिला. व देशामध्ये एक उच्च दर्जाचा आदर्श निर्माण केला. भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ.शामप्रसाद मुखर्जी यांनी 8 एप्रिल 1950 रोजी नेहरू-लियाकत अली करार हा पश्चिम बंगालमधील हिंदुना न्याय देणारा नाही. त्यांना सरंक्षण मिळाण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी देशासाठी बलीदान दिले आहे. परंतु त्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून मुखर्जी यांनी केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्रिय मंत्री चिंतामनराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यामध्ये नेहरूची मोठी अडचण आहे. 105 हुतात्म्ये होऊनही महाराष्ट्र निर्मितीला न्याय मिळत नाही. म्हणून त्यांनी केंद्रिय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. माजी उपपंतप्रधान मा.लालकृष्णजी अडवाणी यांनी हावालकांडमध्ये डायरीन नाव आले म्हणून आपल्या केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामा कोणीही मागणी न करता दिला होता. मुंबईवरती अतिरेक्यांचा हल्ला 30 नोंव्हेंबर 2008 रोजी झाला. त्यावेळी मा.शिवराज पाटील साहेब हे देशाचे गृहमंत्री होते. त्यांना त्यांच्या यंत्रणेमार्फत मुंबईवरती अतिरेकी हल्ला होणार हे समजले होते. त्यावरून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्रालयांना तशा सुचनाही दिल्या होत्या. तरीही अतिरेकी हल्ला झाला. त्यात अनेकांचे प्राण गेले. यामुळे मोठी हानी झाली. त्यानंतर या संदर्भात शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून परिस्थिती नियत्रींत असून काय कार्यवाही होत आहे. याची माहिती दिली. त्यावेळीही कांही मिडीयांनी जाणीवपुर्वक शिवराज पाटील यांनी दिवसातून दोन वेळा कपडे बदलले. त्यांना घटनेचे गांभीर्य नाही, असे चुकीचे आरोप केले. एवढ्याच कारणांसाठी त्यांनी आपण स्वतःहुन मंत्रीपदाचा राजीनामा दिला. याच प्रकरणात त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै.विलासरावजी देशमुख, गृहमंत्री कै.आर.आर.आबा पाटील यांंनी आपल्या पदाचा राजीनामा देवून एक वेगळा आदर्श देशामध्ये व महाराष्ट्रात निर्माण केला. एका बाजुला देशाच्या व राज्याच्या राजकारणाची पावित्र जपण्याचे काम सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केले. त्याच महाराष्ट्रात आज मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची इभ्रत धुळीस मिळवीत आहेत. हे पाहुण महाराष्ट्राची व देशाची जनता व कार्यकर्ते जे विचाराशी बांधीलकी ठेवून कार्य करीत आहेत. त्यांना या घटनेणे प्रचंड धक्का बसला आहे. या परिस्थितीत मा.न्यायालय योग्य निर्णय देवून महाराष्ट्राला न्याय देईल, अशी आशा आहे.
- शिवाजीराव पाटील कव्हेकर
माजी आमदार,लातूर
मो. 9822588999
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.