कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव चा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पुन्हा एकदा सज्ज*
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या शासकीय निवासस्थानी झाली बैठक संपन्न
लातूर प्रतिनिधी --
कोरोना चा प्रादुर्भाव व पुढे होणारी गंभीर परिस्थिती यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाची महत्वपूर्ण बैठक युवा नेते अरविंद भैया पाटील निलंगेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी समाजकल्याण सभापती संजयजी दोरवे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या काळजी वाढवणारी आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करण्यासाठी आवश्यक खाटा ची कमतरता होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोव्हीड केअर सेंटरची स्थापना करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. कोव्हीड केअर सेंटर मध्ये दाखल असलेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, योगा, प्राणायाम शिबिर व आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवा व ग्रह विलगीकरण इत्यादी सेवा दिल्या जाव्यात .
लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 46 प्राथमिक आरोग्य केंद्र असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील पाच खाटा या ऑक्सिजनयुक्त करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
तसेच जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी 5 ऑक्सिजन खाटा उपलब्ध कराव्यात असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिले आहे.
जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिड लसीकरण दररोज करावे व जिल्ह्यातील 252 उपकेंद्र पैकी 68 उपकेंद्रांमध्ये आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरण करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.
आज पर्यंत जिल्ह्यात एकूण 1, 16, 699 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
गावपातळीवर सर्वेक्षण आरटी rat-rtpcr चाचणी तपासणी करण्यासाठी कारवाई करण्यात यावी. प्रत्येक गावात रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका यांच्या आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
अरविंद पाटील निलंगेकर यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्यात याव्यात असे सांगितले
यावेळी अरविंद पाटील निलंगेकर व जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी आरोग्य विभागातील सर्व गोष्टींचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पुढील कोणत्याही परिस्थितीमध्ये सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.