राज्यात उद्यापासून लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागू होणार?… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये 5 एप्रिल ते 18 एप्रिल किंवा 30 एप्रिलपर्यंत असे कडक निर्बंध लावावे का असा मुद्दा कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थितीत केला आहे. लॉकडाऊन न करता कडक निर्बंध करावे असा सूर कॅबिनेट मंत्र्यांनी लगावला आहे.
तसंच जिल्हा बंदी करू नये, अत्याआवश्यक सेवा, उत्पादन निर्मिती व्यवसाय चालू ठेवावे, हॉटेल्स मॉल्स पूर्ण वेळ बंद करता येईल का या विषयावर कॅबिनेट मंत्री चर्चा करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.