कोरोना१९ प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्याकामी* *पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा*

 *कोरोना१९ प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्याकामी* *पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा* 


*मृत्यु टाळावेत म्हणून रूग्णांना वेळेत उपचार उपलब्ध* *करून दया* 




*वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख*




*टप्पया टप्याने लॉकडाऊन उठेल* 


*गरज पडल्यास जब्बो कोवीड केअर सेंटर उभारू* 


*रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध* 


*ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन लसीकरणाचा पर्याय*  


लातूर प्रतिनिधी : ८ एप्रिल :

   कोवीड१९चा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधीत रूग्णावर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. लातूर शहर आणि तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रीय होऊन लोकांमध्ये जागृती करावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी रूग्णांचा शोध घेऊन त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

  लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी गुरूवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालय, मुंबई येथुन लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तसेच तालुक्यातील महानगरपालीका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे प्रमुख यांच्याशी झुम ॲपवदारे संवाद साधला. कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसेच रूग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कामी सक्रीय होण्याचे यावेळी आवाहन केले. 

  प्रारंभी या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांच्या सुचना व म्हणणे पालकमंत्री देशमुख यांनी ऐकून घेतले. कोरोना प्रादूर्भावाच्या संदर्भाने करण्यात येत असलेली जनजागृती, उपचारासाठी करण्यात उभारण्यात आलेल्या सोयीसुवीधा, औषधे व तंत्रज्ञानाची उपलब्धता या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने शंकासमाधान केले. 


*टप्पया टप्याने लॉकडाऊन उठेल*

    कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊन संदर्भाने बैठकी दरम्यान उपस्थित झालेल्या मुददयावर बोलतांना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना प्रादूभा्रवाचा वेग सर्वांधिक आहे. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा अपरीहार्य निर्णय घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यापारी संघटनाच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. एकुण परिस्थितीचे गाभीर्य त्यांना समजावुन सांगितले आहे. सर्वोतोपरी उपाययोजना आयोजील्या आहेत त्यामुळे कोरोना प्रादूर्भाव लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास आहे. यामुळे टप्याटप्याने हा लॉकउाऊन उठविण्यात येणार आहे ही बाब लातूरातही पदाधिकारी यांनी व्यापारी बांधवांना समजावून सांगावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.


*गरज पडल्यास जब्बो कोवीड केअर सेंटर उभारू*

   लातूर शहर व परीसरातील रूग्णावर उपचार करण्यासाठी विलासराव देशमुख वैदयकीय विज्ञान संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व प्रकारच्या सोयीसुवीधा उभारल्या आहेत, उभारण्यात येत आहेत. सुपरस्पेशालीटी रूग्णालयात ५ वॉर्ड आणि वैदयकीय महाविदयालयात १ अतिदक्षता वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. महापालीकेचे ४ कोवीड केअर सेंटर सुरू झाले असून आणखी १ कोवीड सेंटर सुरू होत आहे. या शिवाय आरोग्य विभागाचे समाज कल्याण वसतीगृह येथे कोवीड केअर सेंटर सुरू आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळत आहेत असे सांगून गरज पडल्यास शहरात आणखी १ जब्बो कोवीड केअर सेंटर सुरू केले जाईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.


*रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध*

   रेमडेसिवीर सारख्या औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यांची दखल घेऊन लातूरसाठी पुरेसा प्रमाणात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत. वैदयकीय शिक्षण विभागानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सदया त्याचा पुरेसा साठा जिल्हयात उपलब्ध करून दिला आहे. या औषधाचा अनावश्यक वापर होवून टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास जिल्हयाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रशासनानेही दक्षता घेतली आहे असे पालकमंत्री ना. देशमुख यांनी सांगितले.


*ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन* 

*लस देण्याच्या पर्यायाचा विचार* 

  सदया महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जागतिकस्तरावर काही देशात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आपण आत्ताच अधिक सजग होणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे त्यांचे नियोजन प्रशासकीय पातळीवर होत असून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या मोहिमेला गती देण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हयात पुरेशी लस उपलब्ध होईल शिवाय ज्येष्ठ मंडळींना घरी जाऊन्‍ लस देण्याचा पर्याय देता येईल का यांचाही विचार सुरू असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे त्याच पध्दतीचे काम शहारात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  या बैठकीत बोलतांना महापौर विक्रात गोजमगुंडे यांनी शहरातील कोवीड१९ संदर्भातील सदय परिस्थिती व आखण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शहरात लसीकारणाला गती देण्यात आली असून त्यासाठी लसीकरणाच्या केंद्राची संख्या २१ पर्यत वाढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे उपचारासाठी रूग्णालये व बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी शहरातील लॉकडाऊन व्यापारी, ग्राहक यांच्या अडचणी, औषधे व प्रयोगशाळेतील वाढते दर रूग्णालयातील बेडची उपलब्धतता बाबत सविस्तर आढावा सादर केला. महापालीकेतील विरोधी पक्षनेते दिपक सुळ यांनी होमऑयसोलेशन रूग्णांना घरपोच सुविधा मिळण्याच्या दृष्टीने काही सुधारणा सुचविल्या. घरपोच तपासणी पथके पाठविणे, रूग्णांना रूग्णालयात पोहोचवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता खानापूरे सांगितले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी मार्केटमध्ये शेतीमालाची खरेदीविक्री नियम पाळून करण्यात येत असल्याची माहिती या बैठकी दरम्यान दिली. 

   या बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सरस्वती प्रताप पाटील व उपसभापती प्रकाश ऊफाडे, नियोजन समिती संचालक समद पटेल, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, अहमदखॉ पठाण, गौरव काथवटे, एनएसयु अध्यक्ष शरद देशमुख, सोशल मिडीया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सेवा दल अध्यक्ष सुपर्ण जगताप, युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष जाधव, पंचायत समिती सदस्य नंदकूमार शेटे यांनी सुचना मांडल्या. याशिवाय विविध संस्थाचे पदाधिकारी, सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.   

----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या