पुणे शहरातील "मूलनिवासी मुस्लिम मंच'च्या" कोरोना बाधित मयतां च्या सेवाकार्याची वर्षपूर्ती....
"""""""""""""""""""""""""""""" """"""""""""""""""""""""""""""
(म.शम्स तबरेज कबीर पुणे, कडून सविस्तर रिपोर्ट)
"""""""""""""""""""""""""""""" """"""""""""""""""""""""""""""
(((जेथे कुटुंबीय आपल्या प्रिय जणांची मयत करायला तर सोडा, नुसते तोंड बघायला भित होते त्या वेळी मूल निवासी मंच ची टीम आपल्या जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता कशी सेवा कर
त होती ते पहा)))
"""""""""""""""""""""""""""""" """"""""""""""""""""""""""
6 एप्रिल 2021 रोजी ‘मूलनिवासी मुस्लिम मंच’चा सेवाकार्याच्या कामाची वर्षपूर्ती झाली. वर्षभरापूर्वी पुण्यात कोविड रोगराईचा हाहाकार माजला होता. अटीतटीच्या वेळी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या मदतीच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद म्हणून मूलनिवासी मुस्लिम मंच कोरोना मृतदेहाचे अंत्यविधी करण्यासाठी सक्रिय झाला. आजतागायत सुमारे एक 1080 पेक्षा अधिक विविध धर्मीय मृतदेहाचे आमच्या संघटनेच्या वतीने अंत्यविधी करण्यात आलेले आहेत.
पुण्यात 8 मार्च 2020 रोजी covid-19 चा पहिला रुग्ण आढळला. 30 मार्च 2020 रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे एका 52 वर्षे पुरुषाचा मृत्यू कोरोना आजाराने झाला. हा पुण्यातील पहिला मृत्यू होता. 1 एप्रिल 2020 रोजी ससून हॉस्पिटल येथे एकच दिवसात तीन रुग्ण दगावले.
1 एप्रिल 2020 रोजी नायडू हॉस्पिटल येथे विश्रांतवाडी भागातील एका महिलेची टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. नंतर चार एप्रिल 2020 रोजी त्याच महिलेचा मृत्यू ससून हॉस्पिटल येथे कोरोना आजाराने झाला.
परिवारच्या लोकांनी डेट बॉडी घेण्यास मनाई केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेचा अंत्यविधी केला. त्यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड भिती होती.
8 मार्च 2020 रोजी ससून हॉस्पिटल येथे बारामतीचे मजीद रहमान बागवान यांचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याने त्यांना वडिलांचा मृतदेह स्वीकारणे शक्य नव्हते. तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आवाहन केले की स्वयंसेवी संघटनांनी पुढे येऊन महापालिकेला या कामात मदत करावी. त्यांनी केलेला आवाहनाला सर्वात प्रथम ‘मूलनिवासी मुस्लिम मंच’ संघटना महापालिकेच्या कामात मदत करण्यासाठी पुढे आली.
महापालिकेकडून मान्यता घेण्यापूर्वी कोरोना या आजाराने मरण पावलेल्या 4 मृतदेहाचा अंत्यविधी संघटनेने केला. 9 एप्रिल 2020 रोजी महापालिकेतर्फे अधिकृत मान्यता घेऊन संघटनांने कामाची सुरुवात केली. त्या रोजी पासून तर आजपर्यंत मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी 1080 पेक्षा अधिक सर्व जाती-धर्मांचे मुस्लिम,ख्रिस्ती, शीख, लिंगायत,तेलगू,ब्राह्मण,बौद्ध या सर्व समाज बांधवांचे त्याच्या धर्म परंपरा व मान्यतेनुसार दहन व दफनविधी केले.
विशेष म्हणजे हे काम करत असताना मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून एकही रुपया न घेता व महापालिकेकडून कोणताच मोबदला न घेता हे सर्व काम सेवाभावी वृत्तीने करीत आहोत. आज रोजी आम्ही करत असलेल्या कामाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
सुरुवातीच्या काळात एप्रिल, मे, जून 77 दिवस कडक लॉकडॉन असताना शहरातील सर्व हॉटेल्स दुकाने चहा पाणी टपरी बंद नसताना संघटनाचे 18 कार्यकर्ते रात्रंदिवस अनेक आव्हानांना सामोरे जात काम करीत होतो. सुरुवातीला अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह घेऊन जाताना पुणे शहरातील अनेक मुस्लिम कब्रस्तान, ख्रिश्चन दफनभूमी, लिंगायत दफनभूमी, समशानभूमी येथील ट्रस्टींचा व स्थानिक लोकांचा प्रखर विरोध होता त्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांची मदत घेऊन अंत्यविधी करीत होतो.
या आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींचे काही नातेवाईक सुद्धा जवळ येत नसताना अशा गंभीर परिस्थितीत महापालिकेने दिलेल्या पी.पी.ई कीट परिधान करून कुटुंबाच्या २-४ लोकांना सोबत घेऊन किंवा एकाच घरात राहून सर्व कुटुंबांना ऑनलाइन अंत्यविधी दाखविले जात होते.
मरण पावलेली व्यक्ती आमच्या नात्याचा किंवा कुटुंबाचा असे समजून कुटुंबांचा समाधान होईपर्यंत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे कार्यकर्ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, लिंगायत, तेलगु, ब्राह्मण सर्व जाती धर्मातील लोकांचे त्या-त्या धर्मानुसार सर्व धार्मिक विधी पार पाडत होते.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, शिरूर, जेजुरी, लोणंद, पिंपरी चिंचवड, सातारा येथील वाई, पंचगणी तर नवी मुंबई, पनवेल, रायगड जिल्हा येथे प्रत्यक्षरीत्या जाऊन कार्यकर्त्यांनी अंत्यविधी केले. तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम संघटनेच्यावतीने करण्यात आले.
पुणे शहर व जिल्ह्यातील Covid-19 व इतर आजाराने मरण पावलेल्या काही नामवंत लोकांच्या दहन व दफन करून पुण्य कमविण्याची संधी आम्हाला मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी नगरसेवक, सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका जोत्स्ना भोळे, रात्रंदिवस फिल्डवर असून बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणारे टीव्ही-9चे पत्रकार पांडुरंग रायकर, मुस्लिम विचारवंत व संदेश लायब्ररीचे संस्थापक शेख सलीम, महाराष्ट्राचे नामवंत हॉकीपटू विल्यम स्मिथ डिसोजा व इत्यादी मान्यवरांचा अंत्यविधी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी केला.
संतांची व महापुरुषांची विचारधारा डोळ्यांसमोर ठेवून मानवतावादी विचार हे जिवंत राहिले पाहिजे या पवित्र हेतूने सुरुवातीचे चार महिने अंत्यविधी करण्याचे काम संस्थेचे वतीने मोफत सेवा देण्यात येत होते.
पुणे महापालिकाचे अधिकाऱ्यांनी अचानक 28 लाख रुपयाचा दफन टेंडर काढून आम्ही करत असलेल्या विनामोबदला सेवाकार्याला नफा आधारित कार्य करून टाकले. मृतदेहावर लाखों रुपयांची बोली लावली गेली. मात्र मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने पुणे महानगरपालिकाच्या मुख्य द्वार समोर “मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा दफन टेंडर रद्द करावा” यासाठी धरणे आंदोलन करून दफन टेंडर रद्द करण्यास भाग पाडले.
अंत्यविधी करण्याचे काम कार्यकर्त्यांनी इमानेइतबारे केले. सर्व पुणेकरांची दुआ व आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने आमच्यासोबत काम करणारे 18 पैकी एकही कार्यकर्ता पॉझिटिव्ह झाला नाही किंवा कुटुंबातील कोणालाही त्रास झाला नाही हे विशेष आहे.
मंचाच्या वतीने होत असलेल्या या कामाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने दिनांक 07/04/2021 रोजी पुणे मुस्लिम कब्रस्तान, क्रिश्चन दफनभूमी, लिंगायत दफनभूमी, स्मशानभूमी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन म्रुत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी काम करत असताना सेवा करताना जर चूक झाली असेल तर अल्लाह, ईश्वर, परमेश्वराने आम्हाला माफ करावा असे दुआ पठण करण्यात आले. तसेच या आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींची डेडबॉडी डब्ल्यू.एचओ च्या गाईडलाइननुसार परिवाराला दिली जात नाही. जोपर्यंत म्रुत व्यक्तीच्या परिवाराला डेडबॉडी देत नाही व शासनाच्या धोरणात बदल होत नाही तोपर्यंत आमची संस्था लोकांच्या मदतीसाठी शेवटपर्यंत काम करू असा निर्धार सेवाकार्याचा वर्षपूर्ती मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
याप्रसंगी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, जमीर मोमीन, साबीर शेख (तोपखाना), अमजद शेख, साबिर सय्यद, सलीम शेख, मेहबूब शेख, दानिश खान, आय.टी. शेख, मौलाना शकील, इम्तियाज पटेल, अजलान मनियार, आसिफ शेख, जुबेर शेख, मुहंमद खान, अजहर सय्यद, निसार शेख, इत्यादी कार्यकर्ते सामील होते.
"""""""""""""""""""""""""""""" ""
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.