औशाचे नूतन पोलीस निरीक्षक शीवशंकर पटवारी यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
औसा/ मुख्तार मणियार
औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकुर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी लातूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक एस पटवारी यांची बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काढल्याने नुतन पोलीस निरीक्षक एस पटवारी यांनी औसा पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर दि. 07 एप्रिल 2021बुधवार रोजी औसा पत्रकारांच्या वतीने कोरोना आरोग्य सेतू ॲप नियमांचे पालन करत सत्कार करण्यात आला. शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक एस पटवारी यांनी पत्रकारांशी वार्तालाप करत आपण केलेल्या सेवेच्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगितला व शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने व आरोग्य तज्ञांनी जे नियम सांगितले आहे, त्यांमध्ये मास्कचा वापर करा, नियमित सॅनीटायझरने हात धुवा, गर्दी टाळा, सुरक्षित आंतर ठेवा या नियमांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची व कुटुंबांची काळजी घ्यावी, अशी माहिती दिली. पुढे बोलताना म्हणाले की, औसा शहरांमध्ये संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी औसा नगर पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी चर्चा केली,व शहरातील लातूर मोड येथे वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल बसविण्यासाठीचा प्रस्तावही सादर केल्याचे सांगितले. तसेच दैनिक मनोगत चे संपादक राजू पाटील यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की, औसा शहर हे ऐतिहासिक शहरा बरोबर संतांची भुमी म्हणून ओळखले जाते. त्याच बरोबर शहरातील सर्व समाजाचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतात असे सांगितले.
यावेळी एपीआय नितीन गायकवाड यांच्यासह दैनिक मनोगत चे संपादक राजू पाटील, माजी नगरसेवक विवेक मिश्रा, पुरोगामी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष एस ए काझी, साप्ताहिक स्वर्ण पुष्पचे संपादक किशोर जाधव, पत्रकार इलियास चौधरी, विवेक देशपांडे, विनोद जाधव, बालाजी शिंदे, मुक्तार मनियार, आफताब शेख, पाशा शेख उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.