व्हिडिएफ शिक्षण संस्थेच्या इमारतीत पालकमंत्र्यांनी लातूर साठी भव्य कोविड सेंटर उभारावे.
- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांची मागणी.
लातुर : दि. २२ - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना रुग्णाला बेड ही उपलब्ध होत नाहीत. खाजगी असो की शासकीय सर्वच रुग्णालयामध्ये नवीन आलेल्या रुग्णाला तात्काळ बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशी भयानक अवस्था लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसी मध्ये लातूर बार्शी रोड वर मांजरा साखर कारखान्याच्या समोरचा जो भूखंड व्हिडिएफ शिक्षण संस्थेसाठी ताब्यात घेवुन आज त्या जागेवर भव्य अशा सुसज्ज इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत. तेंव्हा या व्हिडिएफ शिक्षण संस्थेच्या इमारतीत अशा बिकट परिस्थितीमध्ये मोठे कोविड सेंटर उभे करून कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी थांबवावी. अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. या इमारतीमध्ये एक हजार बेडची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकते. तसेच या कोविड सेंटरला लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, असेही पनाळे यांनी म्हटले आहे. एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या शिक्षण संस्थांच्या अशा मोठ्या इमारती शासनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी करण्याची मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. असे केल्यास बेडची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होऊन बेड साठी होणारी रुग्णांची हेळसांड थांबेल असा विश्वास पनाळे यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.