सोशल मीडिया वर फिरत आहे है एस एम एस

 नांदेड मध्ये शारदा कट्रॅकशन च्या मालकांनी मंगल कार्यालयात मोठ कोविड हॉस्पिटल उभं केलं..बीड च्या धनंजय मुंडेच्या एका मित्रांनी स्वखर्चाने ऑक्सिजन प्लांट टाकला.. सोलापूर ला एक मुस्लिम डॉक्टर ने आपलं नवीन उदघाटन न झालेलं हॉस्पिटलम प्रशासनाला कोविड सेंटर चालवण्यासाठी दिल..

   पण आमच्या लातूर शहरात कोट्याधीश असलेले मंत्री अमित देशमुख साहेब,आमदार धीरज देशमुख, मंत्री संजय बनसोडे  , खासदार शृंगारे, लखपती नगरसेवक, करोडपती महापौर,करोडपती विरोधी नेते शैलेश लाहोटी,कोरोडपती कित्येक नेते, उधोजक, व्यावसायिक,  हे अजून उदासीन का आहेत हे जसे निवडणुकीत करोडो रूपये बाहेर काढतात तसे आता ह्या भयंकर परिस्तितीत 25-30 लाखा मदे सुरू होणारा ऑक्सिजन प्लांट का उभारू शकत नाहीत..❓

ह्या सर्व नेत्यांचे मोट  मोठे मंगल कार्यालय,कारखाने, शाळा ,कॉलेजेस ,टोलेजंग इमारती ह्या नेत्यांच्या लातूर शहरात / लातूर जिल्ह्यात आहेत....

 यांनी थोडा फार जनते साठी खर्च केलाही तर यांना काही फरक पडणार नाही जसे समुद्रातून एखादा थेंब काडून घेतल्यास समुद्रातील पाण्याला काही फरक पडत अगदी तसच आहे ह्या वरील व्यक्तींच्या जवळील 100 पैकी अर्धा % टक्का जरी पैस खर्च झाला तरी यांना काही फरक पडत नाही...


आणि यांनी जर आज घडीला जनतेसाठी ऑक्सिजन प्लांट आणि कोविड सेंटर ची स्वखर्चाने व्यवस्था केली तर यांना पुढचे 20 वर्ष कोणताच विरोधक निवडणुकीत हरवू शकणार नाही.... लातूर मधील युवा तर यांचा मोफत प्रचार करील...


जागे व्हा ऑक्सिजन विना आज रात्री किंवा उद्या लातुरात काय  परिस्थिती असेल खाजगी कोविड सेंटर मध्ये कुणी सांगू शकत नाही म्हणून डॉक्टरांना नंतर भांडण्या पेक्षा नेत्यांना भांडा .त्यांच्या दारात जाऊन बसा ..जसे एरवी मंदिर - मज्जीद आणि इतर आंदोलना साठी नगरसेवक आपण आमदार, खासदार यांच्या घरी जाऊन बसतोत .

अगदी तसच ...


टीप- ही पोस्ट सर्व निळया ,भगव्या ,पिवळ्या, हिरव्या लखपती- करोडपती नेते आणि उधोजक, व्यावसायिकांना समर्पित ...

                                               

काळजी घ्या..

*मास्क चा वापर करा*.

*पुणेकर बाॅईज होस्टेल लातूर*.

*8669031061//9423736367*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या