*कोरोना परीस्थीती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यानी तात्काळ राजिनामा द्यावा.*
लातुर : दि. २२ - ( प्रतिनिधी )आज कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असुन महाराष्ट्र सरकारला या परीस्थीतीचा बिल्कुल सामना करता येईना झाला आहे. यांच्या धोरनामुळे महाराष्ट्रातील पेशंन्टचे अत्यंत वाईट हाल होत आहेत. त्यातच पेशेंन्टला ऑक्सीजन, वेंन्टलेटर, बेडसाठी व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पेशेंन्टच्या नातेवाईकांना भटकत फिरावे लागत आहे.
रुग्णांचे असे होत असलेले हाल बंद करण्याऐवजी लातुरचे पालकमंत्री अमीत देशमुख हे मात्र आपला शासकीय ताफा घेऊन खर्डेकर स्टॉफ ते नंदी स्टॉफ असा पायी सफर करून स्टंटबाजी करून निघुन गेले. पण त्यांना स्वताच्या जिल्हयात कोवीड सेंटरमध्ये जाऊन पेशंन्टची साधी विचारपुर करता आली नाही. म्हणुनच अशा निष्क्रीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीराजे मंडलाच्या वतीने एका निवेदानाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे. या निवेदनावर मंडल अध्यक्ष जोतीराम चिवडे पाटील, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष परमेश्वर महांडूळे, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, सरचिटणिस विकास घोडके, पंकज निलामे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर पेशेंन्टला योग्य सुविधा नाही पुराविल्या तर लातुरच्या पालकमंत्र्याना जिल्हयात फिरू दिले जाणार नाही असा इशारा चिवडे पाटील यांनी दिला आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.