केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 114 कोटी रूपय मंजूर केंद्रीय मंत्री गडकरी व खा. श्रृंगारे यांचे माजी पालकमंत्री आ. निलंगेकर

 

केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 114 कोटी रूपय मंजूर
केंद्रीय मंत्री गडकरी व खा. श्रृंगारे यांचे माजी पालकमंत्री आ. निलंगेकर मानले आभार





लातूर/प्रतिनिधी ः- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीतून संपुर्ण देशभरात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यात अनेक  राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून जिल्हाअंतर्गत रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती. याकरीता माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून निधी मंजूर व्हावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. याकरीता खा. सुधाकर श्रृंगारे यांनी लक्ष घालावे अशी विनंती केली होती. या मागणीनुसार जिल्ह्यातील विविध नऊ रस्त्यांसाठी 114 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी मिळालेली आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खा. सुधाकर श्रृंगारे यांचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यास विकासाला अधिक गती प्राप्त होते. त्याचबरोबर शेतकरी व व्यापार्‍यांसाठी हे रस्ते प्रगतीचे महामार्ग ठरू शकतात. या दुरदृष्टीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरु केलेले आहे. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत रस्तेही अधिक दर्जेदार व्हावेत याकरीता केंद्रीय रस्ते विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून लातूर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु असून याकरीता माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतलेला होता. सदर राष्ट्रीय महामार्गचे काम प्रगतीपथावर असून जिल्हाअंतर्गत रस्तेही दर्जेदार व्हावेत याकरीता निधी मंजूर व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आ. निलंगेकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर खा. सुधाकर श्रृंगारे यांनाही याविषयी  लक्ष घालावे अशी विनंती केलेली होती. या मागणीनुसार केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी 114 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी मिळालेली आहे.
या निधीच्या माध्यमातून लातूर तालुक्यातील ढाकणी ते भेटा व सारसा- गाधवड- शिरोळ- बोरगाव (का.)- निवळी, अहमदपूर तालुक्यातील  अहमदपूर ते बेलूर व घाटनांदूर- अहमदपूर- थोडगा- मोघा या रस्त्यांची कामे होणार आहेत. त्याचबरोबर औसा तालुक्यातील औसा- याकतपूर- कन्हेरी- जयनगर- किनीथोट- शेडोळ- खरोसा व चिंचोलीराव वाडी- औसा- नागरसोगा- दापेगाव- गुबाळ- सास्तुर तर उदगीर शहरासाठी बिदर रोड ते छत्रपती शिवाजी चौक ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निलंगा तालुक्यातील उजेड- निटूर- लांबोटा- निलंगा- कासारशिरसी- मुळज- तुरोरी हा रस्ता दर्जेदार होणार असून याच तालुक्यातील निटूर-शिरोळ-हेळंब हा रस्ता होणार असून याच रस्त्यावरील गिरकसाळ येथे मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.
या कामांसाठी आवश्यक असणारा 114 कोटी 27 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आलेला असून लवकरच लातूर जिल्ह्यातील या रस्त्यांच्या कामांस सुरुवात होणार आहे. सदर निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याबद्दल व खा. सुधाकर श्रृंगारे यांनीही याप्रश्नी लक्ष घातल्याबद्दल माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत.

चौकट
निलंगा तालुक्यात मांजरा नदीवर होणार पुल
निलंगा तालुक्यातील निटूर-शिरोळ-हेळंब या रस्त्यावर गिरकसाळ येथे मांजरा नदीवर पुला व्हावा अशी मागणी अनेक दिवसापासून होती. केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून आता या पुलाच्या कामास 56 कोटी 70 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. सदर पुल होणार असल्यामुळे या भागातील नागरीकांची मागणी पुर्ण झालेली असून वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. सदर पुलास मंजूरी मिळाल्याबद्दल या परिसरातील नागरीकांकडून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या