शिवपुजे हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे मोफत लसीकरण केंद्र
लातूर/प्रतिनिधी:शहरातील आघाडीचे हृदयरोग तज्ञ डॉ. संजय शिवपुजे व सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असलेला रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांनी एकत्र येत शिवपुजे हॉस्पिटल, लातूर येथे मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
शिवपूजे हॉस्पिटल हे लातूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेले, सर्व सुविधांनी सुसज्ज असे एक आधुनिक हॉस्पिटल आहे.हे हॉस्पिटल हृदयरोगावर सर्वोत्तम उपचारासाठी प्रसिद्ध आहे. नागरिकांना लसीकरणासाठी खाजगी दवाखान्यात विनामूल्य सोय व्हावी म्हणून डॉ.संजय शिवपुजे यांनी महानगर पालिकेच्या सहकार्याने येथे आता मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे.याठिकाणी महिलांना लस घेण्यासाठी स्वतंत्र सोय असून स्वच्छता, बसण्यासाठी खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची सोय अशा उत्तम सुविधा उपलब्ध आहेत.या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय शिवपुजे व रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाऊन यांनी केले आहे.
यावेळी रोटरीचे वर्ष २०२१-२२चे गव्हर्नर ओम मोतीपवळे,डॉ.पुरुषोत्तम दरक, श्रीकांत पंचाक्षरी, अध्यक्ष अनुप देवणीकर, सचिव रवींद्र बनकर, किशोर दातळ, गणेश सावंत उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.