रुग्णवाहिका हीच आशादायक आरोग्याची गुढी !
निलंगा, दि.13 एप्रिल
आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन डॉ. सौ. समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण येथे संपन्न झाले.
त्यातील २ रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालय, निलंगा; १ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय, शिरूर आनंतपाळ आणि १ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोळ या शासकीय दवाखान्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना आवश्यक सेवा मिळवून देण्यासाठी प्राण वाचवणारी तसेच तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकारी होणारी रुग्णवाहिका ही आजची गरज होती.
या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. राहुल केंद्रे, उपाध्यक्ष सौ. भारतबाई साळुंके, विभागीय अधिकारी श्री. विकास माने, तहसीलदार श्री. गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री. ताकभाते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. प्रल्हाद साळुंके, डॉ. दिनकर पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मल्लिकार्जुन पाटील, निलंगा नगरपालिकेचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. बापूराव राठोड, उपाध्यक्ष श्री. मनोज कोळ्ळे, नगरसेवक डॉ. किरण बाहेती, सभापती श्री. महादू फट्टे, नगरसेवक श्री. शंकरजी आप्पा बुरके, चेअरमन श्री. दगडू साळुंखे, श्री. शेषराव ममाळे जी, श्री. अरविंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.