आम आदमी पार्टीच्या वतीने औसा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन
औसा मुख्तार मणियार
कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांचा घरगुती व कृषी पंप विज बिल प्रश्न निकामी काढा या मागणीसाठी आम आदमी पार्टी औशाच्या वतीने आज दिनांक 5 एप्रिल 2021 सोमवार रोजी औसा तहसीलदार यांना विविध मागणीचे निवेदन सादर केले.या निवेदनात त्यांनी
आपण जनतेला दिलेल्या वचन नाम्याची पुर्तता करण्यात यावी, कोवीड-१९ दरम्यान चे मार्च ते अगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीज बिल माफ करावे, मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळातील थकबाकी वर कोणतेही व्याज आकारू नये, शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफ करावे, वीज कंपन्यांचे सीएजी अॅडीट करण्यात यावे,दि.१ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी. या मागणीचे निवेदन सादर केले आहे. आपण राज्यातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वरील मागण्या येत्या पंधरा दिवसात निकाली काढाव्यात, अन्यथा नाईलाजास्तव आम आदमी पार्टी राज्याचे प्रमुख या नात्याने वचनपूर्ती साठी आपल्या निवासस्थानाबाहेर १९ एप्रिल २०२१ सोमवार रोजी सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने एका निवेदनाद्वारे औसा तहसीलदार यांना दिला आहे.यावेळी आम आदमी पार्टीचे औसा शहराध्यक्ष अहेमद शेख, उपाध्यक्ष अली कुरेशी, शेख बाबर,मिडीया प्रसिद्धी प्रमुख मुख्तार मणियार, अन्वर गिड्डे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.