*लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा दणका !*
*उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापकांचा मोडला मनका ?*
लातुर : दि. ५ - उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील सरव्यवस्थापक महादेव गायकवाड यांनी अधिकाराचा गैरवापर करून स्वतःसाठी बिनव्याजी वहानकर्ज घेतल्याचे प्रकरण तसेच सरव्यवस्थापक महादेव गायकवाड यांचे पुतणे सिद्धेश्वर गायकवाड जे सध्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक वाशी शाखेचे शाखाधिकारी आहेत. सिद्धेश्वर गायकवाड यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या कळंब शाखेतून घेतलेले कर्जात नियमबाह्य व बेकायदेशीर पणे सूट देऊन त्यांचे कर्ज भरून घेतले होते. याबाबतीत रिझर्व बॅंकेच्या ऑडीटरणी सिद्धेश्वर गायकवाड यांचे कर्ज नोटीस मध्ये मिटवता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलेले असताना सुद्धा, सरव्यवस्थापक महादेव गायकवाड यांनी अधिकाराचा गैरवापर करून आणि आपण जनरल मॅनेंजर आहोत आपले कोण काय करणार ? या अविर्भावात एका बँकेचा शाखा अधिकारी असलेल्या त्यांच्या पुतण्याचे कर्जात माफी देऊन कर्ज भरून घेतले होते.
या दोन्ही प्रकरणाबाबत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे जागरुक सभासद तथा ज्येष्ठ पत्रकार व लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आवाज उठवला होता. त्यासंदर्भात रिझर्व बँकेकडे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. वास्तविक पाहता बँकेच्या कर्मचाऱ्यास कर्जमाफी देता येत नाही असे असताना सुद्धा सिद्धेश्वर गायकवाड यास बँकेच्या संचालक मंडळाला अंधारात ठेवून अधिकाराचा गैरवापर करून दिलेली कर्जमाफी, तसेच स्वतःसाठी नियमबाह्य उचललेले वाहन कर्ज याबाबत आवाज उठवला होता. अखेर सिद्धेश्वर गायकवाड यांना माफ केलेले कर्ज आणि महादेव गायकवाड यांनी नियमबाह्य बिनव्याजी उचललेले वाहन कर्ज तात्काळ भरावे लागले आहे.
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सरव्यवस्थापक महादेव गायकवाड यांना मोठा दणका बसला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या अनेक सभासदांनी व्यंकटराव पनाळे यांचे अभिनंदन केले आहे.
बँकेचे सरव्यवस्थापक महादेव गायकवाड यांनी ही केलेली दोन्ही प्रकरणे बेकायदेशीर असून एक प्रकारे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. याबाबतीत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने महादेव गायकवाड यांच्यावर नेमकी काय कार्यवाही केली ? का त्यांच्या या बेकायदेशीर व नियमबाह्य कृतीला माफी दिली याचा खुलासा करावा. अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.