लातूर/प्रतिनिधी: शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग कसा कमी करता येईल? या बाबत सामाजिक संस्था यांच्याशी विचार विनिमय करुन करावयाच्या उपाययोजना याबाबत झुम अॅप (Zoom App) व्दारे दि.०९/०४/२०२१ रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सदर ऑनलाईन बैठकीस मा.महापौर श्री.विक्रांत गोजमगुंडे, मा.आयुक्त श्री.अमन मित्तल व शहरातील सामाजिक संस्थाचे ५५ पदाधिकारी सहभागी झाले.
प्रथमत: आयुक्त श्री.अमन मित्तल यांनी कोरोणा विषाणूचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्याकरीता लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. बैठकीतील चर्चे नुसार लसीकरणाचा वेग वाढविणे, बाहेर गावाहुन येणार्या नागरीकांची तपासणी करणे, बॅंक, दवाखाने, मेडिकल कर्मचारी यांचे लसीकरण करणे, श्री.विलासराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालया मधील तपासणी केंद्र २४ तास चालू ठेवावे, सर्व राजकिय पक्षाची बैठक घ्यावी, लसीकरणाअगोदर रक्तदान शिबीर घ्यावे, Anti Corona Police स्थापन करणे, पोलिसांच्या मदतीला सामाजीक संस्थांचे स्वयंसेवक घ्यावेत अशी बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत उपायुक्त श्री.शशिमोहन नंदा, रोटरी कल्बचे श्री. अनुप देवणीकर, श्री.नंदकिशोर लोया, डॉ.दरक, नाम फाऊंडेशनचे श्री.कमा. कैलास गिरवलकर, आर्ट ऑफ लिविंगचे श्री.महादेव गोमारे, योगवेदांत सेवा समीतीचे श्री.दयानंद जाधव, दक्ष नागरीक फॉऊंडेशनचे श्री. अमृत सोनवणे, ग्रीन फॉऊंडेशंचे उदय कुलकर्णी, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे श्री. माधव बावगे, श्री.शिवदास मिटकरी, श्री. अमोल बनाळे, श्री.सुपर्ण जगताप, मल्हार प्रतिष्ठाणचे श्री.पुष्कराज खुब्बा, मी लातूरकरचे श्री.उमेश कांबळे, बप्पा गणेश मंडळचे श्री.आनंद राचट्टे, पतंजली युवा जिल्हा अध्यक्ष श्री.अमर वाघमारे, खुशी फॉऊंडेशनचे मधुकर सोनवणे, सुमन संस्कार फ़ॉऊंडेशनचे श्री.सचिन मालू, महाराष्ट्र प्लबिंग असोसिएशन अध्यक्ष श्री.इम्रान गोंद्रिकर, श्री.राहुल पाटील, जंगम समाज जिल्हा अध्यक्ष श्री.त्र्यंबक स्वामी, इंजिनिअर असोसिएशनचे श्री.सुधीर बिर्ले, बिल्डर असोसिएशनचे श्री.धर्मविर भारती, बालकल्याण समिती सदस्या श्रीमती सविता कुलकर्णी, श्री. शिरीष पोफळे, श्री.अनिल जायभाये, श्री.ईम्तियाज शेख, श्री.महेश ढोबळे, श्री.दिपक माने, श्री.गणेश गुरमे, श्री.संदेश जाधव, श्री.महेश मुंडे.ईत्यादी सहभागी झाले. सर्वात शेवटी अरोग्य अधिकारी श्री.डॉ. महेश पपाटिल यांनी आभार व्यक्त केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.