*शहरांमधून प्रादूर्भाव अधिक,यंत्रणांनी सजग रहावे*
लातूर प्रतिनिधी
जिल्हयातील एकूण रूग्णवाढीचा आढावा घेतला असता ग्रामिण भागाच्या तुलनेत लातुर व जिल्हयातील इतर शहरात रूग्णसंख्या अधिक गतीने वाढतांना दिसत आहे, त्यामुळे शहरातील कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगळे नियोजन करून त्यांच्या अंमलबजावणीवर जास्तीचे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. एकदा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील रूग्ण शोधण्यासाठी जलद मोहिम राबवावी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही केले आहे.
लातूर जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आखून त्यावरील अंमलबजावनीचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी व्हिडीओ कॉन्फगसिंगव्दारे लातूर जिल्हयातील सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्हयातील एकूण कोवीड१९ प्रादूर्भावाची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवीण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावनी करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षी एवढी रूग्णसंख्या वाढू नये याची दक्षता जिल्हयातील सर्व यंत्रणांनी मिळून घ्यावयाची आहे असेही निर्देश दिले आहेत.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिगळे, महापालीका आयुक्त अमन मित्तल, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी जिल्हाधिकारी श्री ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ.उदय मोहिते, डॉ.हरीदास हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून तर सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
*
---------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.