स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय समितीकडून कव्ह्याची पाहणी
लातूर दि.06-04-2021
स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय मुल्यमापन समितीकडून कव्हा गावची पाहणी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या उपस्थितीत आलेल्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आली. यावेळी कव्हा ग्रामपंचातीच्यावतीने भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रा.गोविंद घार, सरपंच पद्मिनताई सोदले, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांच्यासह पंचाच्या उपस्थितीत स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय मुल्यमापन समितीचे स्वागत करण्यात आले.
कव्हा येथील पाहणी दौर्यामध्ये कव्हा येथील श्री.शिवाजी ग्रंथालय, अंगणवाडी, प्राथमिक उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा या बरोबरच इतर उपक्रमाची पाहणी करून ग्रामपंचायत कव्हा कार्यालयामध्ये सर्व पाहणी करण्यात आलेल्या बाबींचे मुल्यमापन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत निलंग्यातील सहायक गटविकास अधिकारी ए.बी.चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी गुरूलिंग स्वामी, विस्तार अधिकारी संजय आडे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी विशाल ढाकणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या पाहणी उपक्रमांचाच एक भाग म्हणून गावातील महादेव मंदिरामध्ये स्मार्ट व्हिलेज कव्हा या नावाने तयार करण्यात आलेल्या गालीब शेख यांच्या आवाजातील व्हि.डी.ओ.डॉक्युमेंट्री व पी.पी.टी.चे सादरी करण्यात आले. यावेळी शिवशरण थंबा, नामदेव मोमले, माजी सरपंच सदाशिव सारगे, नेताजी मस्के, गोपाळ सारगे,पुजा दत्तात्रय मामडगे,रसुल पठाण, काका घोडके, सुर्यकांत होळकर, डॉ.किरण कर्हाळे, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, ए.एम.अंबुलगे, शरण पाटील, नितीन स्वामी, बी.एस.खरबडे, लक्ष्मण सुर्यवंशी, शिवाजी घार, व्ही.एम.बोथीकर, लक्ष्मीबाई चाफीकानडे, शोभा बरूरे, सुनिता सारगे, उषा भांगावाड, शोभा रणदिवे, दिपाली ठोंबरे, मनिषा होळकर, समिना पठाण, सुनिता कांबळे, कांता विभूते, नागेश कवडे, दत्ता खंडागळे, धनाजी इर्ले, दिलीप जोशी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. या पाहणी दौर्यात कोरोणाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.
------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.