डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन





निलंगा:प्रतिनिधि 

-महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील रक्तसाठा कमी झाला असून त्यासाठी रक्तदान शिबीर घेऊन रक्त संकलन करावे असे आवाहन केले आहे.त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून निलंगा शहरातील शिवराय शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या आनुयायांनी एकत्र येत शहरातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9 ते दु.4 पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी कोरोना काळात राष्ट्रहितासाठी जास्तीत जास्त रक्तदान करून महाराष्ट्र शासनाच्या आव्हानास प्रतिसाद द्यावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करून जयंतीदिनी अभिवादन करावे तसेच रक्तदान करण्यासाठी येतेवेळी मास्क वापरावे व सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तदान शिबीर संयोजक समितीच्या डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. एस एस शिंदे,डॉ. प्रल्हाद सोळुंके, डॉ. उद्धव जाधव, रजनीकांत कांबळे, अंकुश ढेरे, मेघराज जेवळीकर, रामलिंग पटसाळगे,जाधव एम एम,उत्तम शेळके,अनिल अग्रवाल,परमेश्वर शिंदे, विनोद सोनवणे, धमानंद काळे, सुबोध गाडीवान, अमोल सोनकांबळे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या