उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिग्रहीत करण्याचे आदेश

 

उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिग्रहीत करण्याचे आदेश




 

लातूर/प्रतिनिधी:कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असल्यामुळे शहरातील जीवनावश्यक नसलेल्या उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलिंडर अधिग्रहीत करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी झोनल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

   कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे शहरात ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढली आहे.त्यामुळे उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिगृहित करुन कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन भरुन देण्याची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व  साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये शहरामध्ये जीवनावश्यक नसलेले उद्योग आणि त्यांचेकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर तात्पुरत्या कालावधीसाठी अधिगृहीत करुन जमा करावेत असे आदेशात म्हटले आहे.या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन संबंधितांचे व्यवसाय,दुकान उघडुन ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन,तहसिलदार,लातूर यांच्याकडे आजच रिकामे ऑक्सिजन सिलेंडर जमा करावेत असे आयुक्तांनी झोनल अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.


--




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या