देवणी गावातील शिल्पाच्या जतनात उदयगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्याचे योगदान
लातूर जिल्ह्यातील देवणी हे गाव प्राचीन समृद्ध वारसा लाभलेले गांव आहे. या गावात अनेक मंदिरे, शिल्प ,गढ़ी, वाड़े आहेत. येथील गावाचे सर्वेक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी केले होते .तेथील शिल्पांवर शोधनिबंध ही त्यांनी प्रकाशित केले. सर्वेक्षणा दरम्यान तेथील शिल्पाच्या जतनाचे महत्व गावकऱ्यांना डॉ. सोमवंशी एस.आर. आणि डॉ. महाके एम .जी.यांचे पटवून दिले होते त्यामुळे देवणी गावची उदयगिरी महाविद्यालयातील इतिहास विभागाची विद्यार्थिनी माया शिवनखेड़े हिच्या प्रयत्नाने लॉक डाउन काळात रस्त्यावर, नालीत पडलेल्या इतरत्र विखुरलेल्या शिल्पाचे एकत्रिकरण केले गेले होते, या दरम्यान डॉ. महाके एम.जी. यानी नालीवर अंथरलेल्या मंदिराच्या गजथर शिल्पाचा फ़ोटो शिल्प साक्षरता व्हावी व सजगता वाढावी म्हणून सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट केला , तो इतका व्हायरल झाला की त्याची दखल मा. मुख्यमंत्री कार्यालयात घेतली गेली आणि तत्काळ कार्यवाही चे आदेश दिले.पुरातत्व विभागाचे संचालक मा. डॉ. तेजस गर्गे आणि औरंगबाद सहा. पुरातत्व विभागाची टिम यांच्या सौजन्या ने देवणी गावात विखुरलेला रोडमधे बसवलेला व नालीत नष्ट होवू पहाणारा वारसा दिनांक 22 एप्रिल रोजी गावकरी बंधू च्या मदतीने सुरक्षित जतन केला गेला.
याप्रसंगी पुरातत्व सहा. संचालक अजित खंदारे यांनी गावकरी बांधवांना ऐतिहासिक वारसा जतनाचे महत्व ही सांगितले. माया शिवनखेड़े, तिचे वडील आणि बंधू , श्री अमित मानकरी, बसवराज बिरादार,सभापती शिवशंकर जाधव , नागेश जीवने, आदीचे मोलाचे योगदान ही मोहिम पार करताना लाभले तर सहा पुरातत्व विभाग ,औरंगबाद येथील टीम यांचे कोविड काळ असताना ही त्वरित कारवाई चे अत्यंत उल्लेखनीय कार्य केले.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थीनी, पुरातत्व विभाग आणि देवणी ग्रामस्थ यांच्या प्रयत्नामुळे देवणी गावातील समृद्ध वारसा नामशेष होण्या पासून वाचला आहे . उदगीर आणि आजुबाजुच्या परिसरातील ऐतिहासिक वारसा जतनाची जबाबदारी उदयगिरी महाविद्यालयातील इतिहास विभागाने नेहमीच घेतली आहे.
देवणी गावा प्रमाणे सजगता सर्व गावात आली तर ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पाचे जतन आणि संवर्धन कायम होत राहिल त्यासाठी माया शिवनखेड़े सारखे तरुण विद्यार्थी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.