प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रवास सेवा*

 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रवास सेवा* 





 मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या सयुंक्त विद्यमाने मुंबई पोलीस, डॉक्टर,नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक व पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत रिक्षा प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री महोदयांनी 'ब्रेक दि चेन' या  कोरोना महाभयंकर विषाणूचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी  केलेल्या आवाहनाला साथ देण्यासाठी "सलाम तुमच्या कार्याला" या उक्ती प्रमाणे एक मदतीचा हात म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई (बोरीवली) विभागातील आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणारे मुंबई पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक आणि पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या दोन रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरजेनुसार रिक्षा वाढवल्या जाणार आहेत. या मोफत प्रवासाचा  गरजूनी लाभ घ्यावा व संघटनेला सहकार्य करावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर व मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल यांनी केले आहे.

रिक्षा चालक व मालक विश्वास पातेरे आणि चद्रंकात जाधव यांनी संघटनेने दिलेल्या मोफत सेवा करण्याच्या संधीचा लाभ आपल्या वाट्याला आल्यामुळे संघटनेचेे आभार मानले. 

उद्घाटनाप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, सत्य  पोलीस टाइम्सचे उपसंपादक व मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, संघाचे पदाधिकारी  पत्रकार चद्रंकांत जाधव, पत्रकार ललित बाईंग, पत्रकार मेघा मोरे पत्रकार श्रुतिका कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या