लातूर जिल्ह्यातील औसा शहरात विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना चाचणी
औसा प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना देखील नागरिकांना त्याचे गांभीर्य आलेले नाही.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्यासमोर खूप मोठे आव्हान ठरत आहे, राज्य सरकार वाढती रुग्ण संख्या कमी होण्यासाठी कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे, आरोग्य कर्मचारी पोलिस कर्मचारी नगर परिषदेचे कर्मचारी महसूल
विभाग अहोरात्र काम करत आहे, राज्यात वाढ होत असलेली रुग्ण संख्या डोकेदुखी ठरत आहे आणि यातच विनाकारण घराबाहेर फिरणार्या दुचाकी-चारचाकी व टवाळखोर यांना दि 22 एप्रिल 2021 रोजी औसा येथे हनुमान मंदिर परिसरात कोरोणाची चाचणी करण्यात आली, यात 57 जनाचे टेस्ट घेण्यात आले त्यामध्ये 55 जणांचे आव्हाल निगेटिव्ह तर दोघांचे आव्हाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत ,
या वेळी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स टीम, तहसीलदार शोभा पुजारी,पोलिस निरीक्षक पटवारी,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण,औसा नगरीचे नगराध्यक्ष डॉ, अफसर शेख, पी,एस,आय,गायकवाड, डॉक्टर सचिन रणदिवे, डॉक्टर मजगे, पोलिस कर्मचारी संजय कांबळे,शाहनवाज शेख,डीगे सर,चव्हाण सर,नगर परिषद कर्मचारी सचिन ओव्हाळ,युवराज कसबे,प्रसाद पुंड ,अजय बनसोडे, सह आदी कर्मचारी उपस्थित होते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.