*तानसा पाईपलाईन पुनर्वसन प्रकल्पापासून कोणीही वंचित राहणार नाही. डॉ. राजन माकणीकर*
*मुंबई दि (प्रतिनिधी) मुंबईची जीवन वाहिनी तानसा पायीपलाईन च्या परिसरातील गलिच्छ वस्ती तील झोपडीचे पुनर्वसन करण्यात येत आहे, कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.*
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातुन येथे पुनर्वसन काम चालू असले तरी, मूळझोपडी धारकांना काही पुराव्याअभावी प्रकल्पापासून वंचित ठेवण्यात आले असल्याच्या असंख्य तोंडी व लेखी तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे संबंधित विभागाच्या जिल्हाधिकारी यांच्याशी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे, राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर व राज्य सचिव श्रावण गायकवाड यांच्या शिस्तमंदलाने नुकतीच भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याच्या संगनमताने एका झोपडीला 2 दरवाजे करून सर्वेक्षणप्रसंगी झोपडीला 2 क्रमांक पाडून घेण्यात आले आहेत मात्र: असे असले तरी काही हरकत नाही किंबहुना जे मूळ झोपडी धारक आहेत त्यांच्या वर अन्याय होऊ नये असे होत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी दिला.
ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्या बद्दल कोणताच आक्षेप नसून ज्यांनी डावलण्यात आले आहे जे लाभापासून वंचित आहेत अस्यांना रिपाई डेमोक्रॅटिक बळ देत आहे. म्हणून वंचितांनी स्वतःला दुबळा समझु नये. असा आत्मविश्वास डॉ. माकणीकर यांनी दिला.
झोपडी धारकांना कागदपत्र पडताळणी मध्ये शिथिलता द्यावी व मूलभूत हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून कोणाला काही अडचण आल्यास संबंधित महापालिका अधिकारी काही सहकार्य करत नसतील आणि हक्कापासून वंचीत राहणार असल्याचे जाणवल्यास रिपब्लिकन भवन फोर्ट मुंबई येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ९००४५४५०४५ क्रमांकावर आपली तक्रार व्हाट्सअप्प करावी असेआवाहन रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने करण्यात आले आहे.
प्रकल्पापासून एकही बाधित वंचित राहिला नसला पाहिजे झोपडपट्टी गुंडापासून सावधान राहावे, पैस देऊन कोणी काम करतो असे सांगत असेल तर अश्या झोपडपट्टी दलालापासून सावध राहावे, कागदपत्रांची पूर्तता असेल तर कोणताही अधिकारी आपली झोपडी अपात्र करू शकणार नाही. आणि आम्ही ते होऊ देणार नाही असा आशावाद माजी आमदार टी.एम कांबळे यांचे सुपुत्र व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.