विकेन्ड लाॅकडाऊनला औशात साखळी तोडण्यासाठी अभूतपूर्व बंद

 विकेन्ड लाॅकडाऊनला औशात साखळी तोडण्यासाठी अभूतपूर्व बंद








औसा मुख्तार मणियार

कोरोना विषाणूंचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन राज्यातील सरकारने सोमवार ते शुक्रवार काही निर्बंध आणि शनीवार- रविवारी पूर्णतः लाॅकडाऊनची घोषणा केली असून विकेन्डच्या पहिल्या दिवशी औसा शहरात अभूतपूर्व बंद पाळून व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला. संपूर्ण औसा शहरात दवाखाने व औषध विक्रेत्यांची दुकाने वगळता सर्व व्यापारी आस्थापनांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांसाठी कडक लाॅकडाऊन लागू केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.शनीवारी दुपारपासून मेघगर्जना होऊन काही ठिकाणी अवकाळु पाऊस पडल्यामुळे शेतावरची कामेही खोळंबली.९ एप्रिल रोजी जिल्ह्यात १४०० पाॅझिटिव  रूग्ण आढळून आल्याने प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्ण संख्येत भर पडत आहे.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांच्या लाॅकडाऊनला प्रतिसाद देत घराबाहेर पडणे ही टाळले आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत कुणीही फिरकले नाही.आत्यावश्यक कामासाठी मोजकेच लोक घराबाहेर पडल्याचे दिसून आले.खाजगी वाहन चालकांनाही आपले वाहने घराबाहेर आणण्याचे प्रकषिनी टाळल्याने शहरातील रस्ते ओस तर सर्वच व्यवसाय बंद असल्याने अभूतपूर्व टाळेबंदीचा अनुभव आला.महसूल ,नगरपालिका, आरोग्य विभागासह पोलिस प्रशासनाने लॉकडाऊन यशस्वितेसाठी प्रयत्न केले। पोलिस निरिक्षक पटवारी यांनी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या