क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त 130 बॉटल रक्तदान करण्याचा संकल्प
औसा-औसा येथील आंबेडकरीं वैचारिक प्रेमी महिला कार्यकर्त्या सौ कल्पना ताई डांगे यांनी क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त महिला कडून एकशे तीस बॉटल रक्त जमविण्याचा संकल्प केला आहे.
बुधवार दि 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वा औसा येथे महिला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी औसा तालुक्यतील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी महिलानी रक्तदान आवश्य करावे कारण एक वर्षापेक्षा जास्त काळापासून कोरोणा या महामारीने अवघ्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला याबाबत सतत बातम्या येत असताना आणि वैद्यकीय सुविधा सह रक्त संकलन केंद्रातील रक्तपुरवठा ही कमी पडत असल्याने या रक्तदानाचा फायदा गरजू नागरिकांना व्हावा यासाठी महामानव,क्रांतीसुर्य,प पु,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांकडून रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.
रक्तदान केल्याने हृदयविकाराच्या आजाराची शक्यता कमी होते कारण शरीरातील धमन्या वेगाने वाहतात,रक्तदान केल्याने रक्त पेशी वाढतात, वजन कमी होते हृदय विकाराशी निगडित असणाऱ्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते तर लोहाची रक्तातील मात्रा संतुलित राहते,रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो यामुळे सर्व भारतीय महिलांना विनंती आहे की त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन कल्पनाताई डांगे, पंचशीला बनसोडे, सुमित्रा जाधव,निलावती कांबळे, रूपाली बनसोडे, निशा कांबळे,इंदुमती कांबळे,आदींनी केले असून या कार्यक्रमाचे आयोजक भिम नगर,समता नगर,बौद्धनगर जयंती कमिटी औसा हे आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.