*अखेर पुणे शहराच्या कोंढवा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानचा आजचा प्रश्न मार्गी लागला*

 *अखेर पुणे शहराच्या कोंढवा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानचा आजचा प्रश्न मार्गी लागला*









पुणे(म.शम्स तबरेज कबीर) कोरोना चा पहिला रुग्ण 4 मार्च 2020 रोजी पुण्यात आढळला पहिला मृत्यू आढळलं पहिला मृत्यू 30 मार्च रोजी पुण्यात झाले. एक एप्रिल 2020 रोजी कोंढवा या भागातील एक मुस्लिम व्यक्तीचा कोरोना आजाराने निधन झाले व त्या व्यक्तीला राहत बाग कौसर बाग मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यविधी करण्यात आले. एक एकर असलेल्या सदरच्या जागेवर साधारण साडेतीनशे पेक्षा अधिक मृत्यू देह या ठिकाणी दफन करण्यात आले सर्वे नंबर 13 एक एकर असलेली जागा गेल्यावर्षी 11 जून 2020 रोजी सदर जागेचा कबरस्थान साठी महापालिकेने उपलब्ध करून दिले होते गेल्यावर्षी 12 जून रोजी पहिला मृत्यू त्या जागेवर दफन करण्यात आले होते तेव्हापासून तर आज रोजी पर्यंत साधारण साडेतीनशे पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांचे त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले बघता बघता सदरची असलेली एक एकर जागा हे पूर्णपणे भरून गेल्याने स्थानिक कोंढवा भागातील रहिवासी मुस्लिम बांधवांचे प्रचंड हाल होत होते.

राहत बाग कब्रस्तान चे मुख्य ट्रस्टी शफी पठाण हे शेजारी असलेल्या जागेसाठी  सतत पाठपुरावा करत होते. नुकताच काल एक शिष्टमंडळ  स्थानिक नगरसेविका नंदा लोणकर व त्यांचे सहकारी महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी भेट घेऊन शेजारी असलेल्या सर्वे क्रमांक13 हिस्सा क्रं 9,11,12. सदरची जागा कब्रस्तान साठी आरक्षित असलेली जागा उपलब्ध करून द्यावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले स्थायी समिती सदस्य सौ नंदा लोणकर यांनी विशेष लक्ष घालून सर्वे क्रमांक 13 याची जागा तातडीने राहत बाग येथील कबरस्तान मुस्लिम दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिले त्यामुळे तीन लाख लोकसंख्या असलेल्या कोंढवा भागातील मुस्लिमांच्या प्रश्न मार्गी लागला व आज दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी नगरसेविका नंदा लोणकर यांच्या उपस्थितीत शफी पठाण, हाजी नजीर भाई शेख ट्रस्टी राहत बाग कब्रस्तान ट्रस्टी मौलाना कादरी, अंजुम ईनामदार, मझहर भाई, मोहसीनभाई ,मुलांनी साहेब, मोहम्मदिन खान, गाजे खान, झहीर शेख, युवराज लोणकर, याकुब शेख, समीर पठाण, समीर शेख, नईम शेख,  या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दफन विधी भूमी ताब्यात घेतली व मौलाना इस्तयाक कादरी यांनी दुआ केली.

तसेच मुलनिवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम ईनामदार, व त्यांचे सहकारी  उपस्थित होते . यावेळी उपस्थित मान्यावरांचे राहतबाग ट्रस्टचे प्रो. शफी पठाण यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या