लातूरच्या आरोग्यसेवेसाठी कॅलिफोर्नियातुन १ लाखाची मदत
महापौराच्या कार्यास प्रेरित होवून वेंकटेश बिराजदार यांनी साता समुद्रापार राहून जपली माणुसकी
मदतीतून वैद्यकीय साहित्याची खरेदी
लातूर/प्रतिनिधी:विदेशात राहत असलो तरी आपल्या जन्मभूमीची ओढ काय असते हे एका लातूरकर सुपुत्राने नुकतेच दाखवून दिले. लातुरातील कोरोना स्थिती पाहता त्यांनी आरोग्यसेवेसाठी १ लक्ष रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आणि महानगरपालिकेच्या खात्यात रक्कम जमाही केली. या रकमेतून आरोग्य सुविधेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यात आल्याचे सांगून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि महानगरपालिका झोकून देवून अहोरात्र करू करीत आहे, त्यांच्या कामास प्रेरित होवून
मुळचे लातूरचे पण सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास असलेले व्यंकटेश बिराजदार हे सोशल मिडीयाद्वारे महापौरांशी जोडलेले आहेत. सध्या मनपाचे सुरू असलेले कार्य आणि लातूरमधील कोरोना परिस्थितीची माहिती घेत त्यांनी स्वतः मेसेज करुन १ लक्ष रुपये लातूरकरांच्या आरोग्य सेवेसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने लातूर महानगरपालिकेच्या खात्यामध्ये पाठवली.
व्यंकटेश बिराजदार यांनी पाठविलेल्या मदतीमधून मनपाच्या डेडीकेटेड कोविड केअर सेंटर करिता ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर मशीन,बी.पी.ई अप्रांटिस, ग्युकोमीटर यासह आवश्यक औषधे खरेदी करण्यात आली.लातूरच्या या दातृत्ववान सुपुत्राचे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आभार मानले. सोशल मिडीयाचा असाही फायदा होत असल्याचे नमूद केले.
विविध कारणांनी अनेकजण आपले गाव,राज्य आणि देश सोडून परदेशात जातात.असे असले तरी
त्यांच्या हृदयात जन्मभूमीची ओढ कायमच असते.या ओढीमुळेच बिराजदार यांनी आपल्याशी संपर्क साधत आरोग्य सुविधेसाठी मदतीची भावना व्यक्त केली. महानगरपालिका लातूरकरांचे आरोग्य जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्यंकटेश बिराजदार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे मनपाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले असल्याचेही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.