अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा कोरोना बाधितांना आधार
लातूर/प्रतिनिधी:कोरोना महामारी प्रचंड वेगाने आपले हातपाय पसरत आहे.दररोज हजारावर रुग्ण आढळत असून कोरोनाची बाधा झाल्यानंतर नागरिक हवालदिल होत आहेत.अशा नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यासह सर्वतोपरी मदत करण्याचे काम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने केले जात आहे.
यासंदर्भात माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश ढवळे यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक घाबरून जातात.त्यातच शासकीय व खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.अशा स्थितीत ग्राहक पंचायत समन्वयाची भूमिका पार पाडते.जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार हे काम केले जाते.
संबंधित रुग्णाला सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.आजपर्यंत २७ बाधित रुग्णांना ग्राहक पंचायतीच्या वतीने बेड मिळवून देण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेड तसेच काहीवेळा अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटर व इंजेक्शनची गरज शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाते.त्यामुळे रुग्णाला मोठी मदत होते.
शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना कोरूना वरील उपचारादरम्यान मदतीसाठी ग्राहक पंचायत तत्पर आहे. यासाठी संबंधितांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे(7776993339 ),
इस्माईल शेख (8329877770),संगमेश्वर रासुरे,(7588237506),
धनराज जाधव (9766201219)
चाकुर तालुका व परिसरातील गावांसाठी दत्तात्रय मिरकले ( 9922163098),संतोष गायकवाड,महादेव बंडे व बळवंतराव कागले,रेणापूर,
सुधीर पुरी,निलंगा,इनुस चौधरी,अशोक देशमाने,प्रा.नागोराव माने,औसा,प्रा.माधव गुंडरे,अहमदपूर,अजीज मोमीन जळकोट,शेषेराव माने,देवणी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.