लातूर जिल्हयाला सदयस्थितीत आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होत आहे रूग्ण व त्याच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये

 


लातूर जिल्हयाला सदयस्थितीत आवश्यक

तेवढा ऑक्सिजन पुरवठा होत आहे

रूग्ण व त्याच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये

डॉक्टरांनी ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करावा

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

 

लातूर प्रतिनिधी : २१ एप्रिल :

   कोवीड१९ रूग्णसंख्येत दिवसेदिवस वाढ होत असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती असली तरी लातूर जिल्हयाला सदयस्थितीत आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होत आहे, त्यामुळे रूग्ण व त्याच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

   या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या संदर्भाने बातम्या प्रसिध्दी माध्यमांमधून प्रसिध्द होत आहेत. रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे, ही बाब खरी असली तरी लातूर जिल्हयाला आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

  संकट मोठे असले तरी शासन आणि प्रशासन तत्पर आहे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड मोठा आहे पहिल्या लाटेच्या तुलनेत तो चौपटीने अधिक जाणवतो आहे. बांधीत झालेल्या सर्व रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम करीत आहेत. शासकीय आणी खाजगी रूगणालयातील उपचार घेत असलेल्या या रूग्णांसाठी औषधे, ऑक्सिजन व इतर सुवीधा पुरवण्यासाठी शासकीय पातळीवरून सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

   करोनाची ही दुसरी लाट येत्या काही दिवस आणि आठवडयामध्ये कोणते रूप धारण करते यावर आम्ही बारकाइने लक्ष ठेऊन् आहोत. सभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वेातोपरी उपाययोजना उभारण्यात येत आहेत. आगामी काळातही औषधे ऑक्सिजन याचा पुरवठा सुरळीत राहील याचे नियोजन केले आहे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नागरीकांनी कोणत्याही परिस्थीतीत घराबाहेर पडू नये स्वताला व आपल्या कुटूंबाला कोरोना प्रादूर्भाव होणार नाही याची सर्वांनी काळीज घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

डॉक्टरांनी आवश्यकतेनुसार

काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करावा

   सदयाची परिस्थिती अभुतपुर्व आहे त्यामुळे उपलब्ध होणारा ऑक्सिजन डॉक्टर मंडळीनी आवश्यकतेनुसार काटकसरीने वापरावा असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी या निवेदनावदारे केले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही वस्तुस्थिती स्विकारावीच लागेल. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. त्यामुळे आपणाला उपलब्ध ऑक्सिजनचा उपयोग हा आवश्यक तेवढाच आणि काटकसरीने करावा लागणार आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन वाया जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार घडणार नाहीत याची काळीज डॉक्टर्स आणि रूग्णांलयाच्या व्यवस्थापकांनीही घ्यावी असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

---------------------------

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या